Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्य पक्षाच्या आंदोलनाला यश आंदोलन केलेल्या स्थळी दहा मिनिटात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन बुजविले खड्डे

नाशिक प्रतिनिधी - स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी महाराज व महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या आदेशाने स्वराज्य पक्षाच्या वतीने आज

लातूर जिल्हा बँकेच्या आर्थिक मदतीने युवक शेतकरी झाला रेशीमचा यशस्वी उद्योजक
पोलिस भरतीचे स्वप्न अधुरे…व्यायाम करणार्‍या युवकाचा अपघाती मृत्यू
तर… विधानपरिषद कायमची बरखास्त करणेच योग्य !

नाशिक प्रतिनिधी – स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी महाराज व महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या आदेशाने स्वराज्य पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रभर खड्डे मुक्त महाराष्ट्र करा यासाठी आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भात आंदोलन केली गेली, त्यामध्ये नाशिक शहरा मधील सातपूर विभागात पपया नर्सरी या चौफुली वर अनेक दिवसांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते व आजही असताना देखील नाशिक महानगरपालिका हे खड्डे बुजविण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नसल्याचे दिसून आले.  या विरोधात स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत सदर ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले. हे आंदोलन चालू असतानाच महापालिकेला जाग आली त्या ठिकाणी येवून महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी स्वराज्य पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि लागलीच महापालिकेचे कर्मचारी बोलून असलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले.

यावेळी उपस्थित स्वराज्याच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन करण्यात आले की नाशिक शहरांमध्ये ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत ,रस्ते खराब झाले आहेत त्या ठिकाणावरील खड्डे महापालिकेने तात्काळ बुजवावे अन्यथा प्रत्येक ठिकाणी स्वराज्य पक्ष अशाच पद्धतीने आंदोलन करेल असे आवाहन केले. सातपूर विभागात औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी दररोज हजारो कामगारांची येजा असते असंख्य लहान मोठी वाहने ही या रस्त्यावर धावत असतात त्यामुळे या भागातील खड्ड्यांवर जास्तीत जास्त लक्ष महापालिकेच्या वतीने द्यावे कारण याच भागातून महापालिकेला सगळ्यात जास्त कर मिळत असतो. या रस्त्यांवर अनेक वेळा गंभीर असे अपघात होऊन लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे त्यामुळे या भागासह नाशिक मधील सर्व खड्डे बुजवावे व रस्त्यांची डागडुजी करावी. यानंतर अशी परिस्थिती पुन्हा निदर्शनास आल्यास थेट महापालिकेत आयुक्तांच्या दालनात स्वराज्य पक्षाच्या वतीने  आंदोलन केल्या जाईल असा गर्भित इशारा देखील देण्यात आला.

या आंदोलनात उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, नाशिक कसमादे व पश्चिम विभाग जिल्हाप्रमुख आशिष हिरे,पूर्व विभाग जिल्हा प्रमुख उमेश शिंदे, सर राज्य कार्यकारणी सदस्य नवनाथ शिंदे, किरण डोके,ज्ञानेश्वर थोरात,नाशिक युवक महानगरप्रमुख पुंडलिक बोडके,युवक जिल्हाप्रमुख नितीन दातीर,जिल्हा कार्याध्यक्ष गिरीश आहेर,नितीन पाटील, विद्यार्थी आघाडी महानगरप्रमुख सागर पवार,दिनेश नरवडे,उत्तर महाराष्ट्र प्रमुख महिला आघाडी मनोरमा पाटील,राज्य कार्यकारणी सदस्य पुष्पाताई जगताप,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुलक्षणा गवळी, ज्ञानेश्वर कोतकर, सुदर्शन हिरे,योगेश चव्हाण,दादासाहेब जोगदंड,रागिणी आहेर,रेखाताई पाटील,संतोष रोकडे कैलास गायकर,सुधीर काळे,अनिल वाघचौरे,महेंद्र खेडकर,गिरी सर,उत्तम विधाते आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

COMMENTS