Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चकलांबा येथील विद्यार्थ्यांसाठी नविन विशेष बस सुरु

चकलांबा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील चकलांबा  येथील माध्यामिक विद्यालय व जिल्हा परिषद माध्यमिक शाळा यांनी मागील काही दिवसांपासून आगार प्रमुखाना

पोलिसांसमोर कपडे फाटेपर्यंत मारहाण
शेअर बाजार कोसळला ; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटींचे नुकसान
पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार ः कृषिमंत्री धनंजय मुंडे

चकलांबा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील चकलांबा  येथील माध्यामिक विद्यालय व जिल्हा परिषद माध्यमिक शाळा यांनी मागील काही दिवसांपासून आगार प्रमुखाना निवेदन, अर्ज दिले होते. यामध्ये खळेगाव,पौळाचीवाडी,महांडुळा व महांडुळा तांडा तसेच हिवरवाडी या गावातील विद्यार्थ्यांना चकलांबा येथे जाण्यासाठी एकच एसटी सुरू होती आणि त्या गाडीत गर्दी असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना जागा नसल्याने त्या विद्यार्थ्यांना पायी जावं लागत होते. या निवेदनाची अर्जाची दखल घेऊन डी.एम.सोनवणे व टी.आय.तांगड साहेब यांनी आणखी एक एसटी सुरू केली आहे.यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
यामध्ये माध्यमिक शाळेचे 95विद्यार्थी पासधारक आहेत व 20विद्यार्थी टिकिटाने  प्रवास करीत आहे.जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे या शाळेचे 25 पास धारक आहे . असे सर्व विद्यार्थी जवळपास 150 आहे. आज त्यांच्या मागणीला व ग्रामस्थश्रच्या मागणी यश आले आहे. आज सकाळी एस टी गावात आल्यावर वाहक डि.बी. धोत्रे, चालक एन. बी. राठोड यांचा शाल व श्रीफळ देऊन दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक भागवत गर्कळ सर, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक माने सर, व शिक्षक वृंद शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष अर्जून शिंदे,राजु शेख, पत्रकार बांधव, पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

COMMENTS