Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमेरिकास्थित माजी विद्यार्थ्यांने योगेश्वरी शाळेला दिले व्हाईट बोर्ड

विदेशात राहून जपली शाळेबद्दल आपुलकी

अंबाजोगाई प्रतिनिधी - अमेरिकेत स्थित असलेल्या  माजी विद्यार्थी आणि संशोधक यांनी येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाला शैक्षणिक साहित्य म्हणून दहा व्हा

प्रफुल्ल पटेल लोकसभेसाठी इच्छुक
शेवगावमध्ये 23 नोव्हेंबरला मनोज जरांगे यांची विराट सभा
अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताचा प्रयत्न…गुन्हा दाखल

अंबाजोगाई प्रतिनिधी – अमेरिकेत स्थित असलेल्या  माजी विद्यार्थी आणि संशोधक यांनी येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाला शैक्षणिक साहित्य म्हणून दहा व्हाईट बोर्ड दिले. श्रीकांत अनुरथराव सुरवसे हे मुळ अंबाजोगाईचे आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते अमेरिकेत राहातात.एका नामांकित कंपनीमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक साहित्याची मदत केल्याबद्दल शाळेत दि.26 कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता .यावेळी आधार माणुसकीचे संस्थापक ड. संतोष पवार, अनुरथ सुरवसे, शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा पाठक, उपमुख्याध्यापक विलास गायकवाड, पर्यवेक्षक रवी मठपती, विवेकानंद कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
योगेश्वरी नूतन विद्यालयासाठी दहा व्हाइट बोर्डची आवश्यकता असल्याचे आधार माणुसकीचा उपक्रमाचे प्रमुख ड. पवार यांनी योगेश्वरी शाळेचे माजी विद्यार्थी श्रीकांत अनुरथ सुरवसे टेक्सास, अमेरिका यांना विनंती केली. श्रीकांत सुरवसे यांनी ’आधार माणुसकीचा’ उपक्रमास तात्काळ देणगी जमा करून, एनजीओ मार्फत 10 व्हाईट बोर्ड उपलब्ध करून देण्यात आले. दरम्यान माजी विद्यार्थी श्रीकांत सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नियमित अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचन करा. मैत्री चांगल्या मुलांशी करा .जीवनात मेहनत आवश्यक आहे. आपण सर्वजण समाजाचे देणे लागतो. वंचित, उपेक्षित व दुर्लक्षित घटकांना होईल तेवढी अधिकाधिक मदत करा. असे आवाहन सुरवसे  यांनी केले. ड. संतोष पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सहशिक्षक भागवत मसने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपमुख्याध्यापक विलास गायकवाड यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS