बीड प्रतिनिधी - शहरातील बुंदलपुरा भागात असलेली धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत कोसळण्याच्या स्थितीत आली होती. याची नोंद घेत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ
बीड प्रतिनिधी – शहरातील बुंदलपुरा भागात असलेली धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत कोसळण्याच्या स्थितीत आली होती. याची नोंद घेत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी याविषयी प्रसिद्धी माध्यमातून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि बीड नगरपरिषद मुख्याधिकारी यांना उद्देशून बातमी दिली होती. याची नोंद घेत जिल्हा प्रशासनाने धोकादायक स्थितीतील असलेली शाळेची भिंत पाडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सदरील शाळेपासून होणारा संभाव्य धोका टळला आहे.
प्रशासन जागरूक आणि गतिमान असेल तर नागरिकांकडून आलेल्या सूचना किंवा तक्रारींवर कशाप्रकारे पटकन कामे केली जातात याचे उदाहरण या कार्यानिमित्ताने समाजासमोर आले आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी हे कर्तव्यदक्ष व जनतेकडून आलेल्या सूचनांकडे लक्ष देणारे असतील तर आवश्यक असलेली कामे कशी पटकन होतात याचा अनुभव धोंडीपुरा शाळेच्या जीर्ण झालेल्या भिंतींना पाडण्याचे कार्य सुरू झाल्याने दिसून आले आहे. प्रचंड उंचीच्या असलेल्या शाळेच्या भिंती जेसीबी लावून पाडण्यास सुरुवात झाली असल्याने आता या भिंतींपासून होणारा संभाव्य धोका टळला आहे. यामुळे जागरूक आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे आणि सदरील बातमी प्रकाशित करणारे सर्व वृत्तपत्रे, वेब पोर्टल यांचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी आभार व्यक्त केले आहे.
COMMENTS