प्रत्येक सैनिक हा देश,सेना व बटालियन च्या दृष्टिने गर्वाची गोष्ट असते.भारतीय सेना व मेकॅनाईज्ड इन्फ्रन्ट्री रेजिमेंट चा गौरवशाली इतिहास आपणास नेहमीच प्रेरणा देत राहील.
अहमदनगर : प्रत्येक सैनिक हा देश,सेना व बटालियन च्या दृष्टिने गर्वाची गोष्ट असते.भारतीय सेना व मेकॅनाईज्ड इन्फ्रन्ट्री रेजिमेंट चा गौरवशाली इतिहास आपणास नेहमीच प्रेरणा देत राहील.भारतीय सेनेत दाखल होण्यापूर्वी सर्व रिक्रुट जवानांनी खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या सैनिकी जीवनाचा एक टप्पा पूर्ण केला आहे.प्रत्येक सैनिकाच्या जीवनात सैनिक धर्म हा त्याच्या वैयक्तिक धर्मापेक्षा मोठा असतो.त्या दृष्टीने पुढील जीवनात सर्वांना सैनिक धर्माचे पालन करायचे आहे,असे प्रतिपादन एमआयआरसी चे कमांडंट ब्रिगेडियर विजयसिंग राणा यांनी केले.
मेकॅनाईज्ड इन्फ्रन्ट्री रेजिमेंट सेटर (एमआयआरसी) मधील अखौरा ड्रील स्क्वेअर मैदानावर गुरूवारी सकाळी आयोजित दीक्षांत परेड समारंभात प्रमुख अतिथी म्हणून एमआयआरसी चे कमांडंट ब्रिगेडियर विजयसिंग राणा बोलत होते.यावेळी एमआयआरसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.ब्रिगेडियर विजयसिंग राणा म्हणाले की,भारतीय सेना व मेकॅनाईज्ड इन्फ्रन्ट्री रेजिमेंट चा इतिहास गौरवशाली आहे.सध्याच्या स्थिती मध्ये देशाच्या शत्रूबरोबरच काही विदेशी शक्ती व अंतर्गत अलगाववादी शक्तींच्या विरोधात देखील भारतीय सेनेला महत्वपूर्ण कामगिरी करावी लागत आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी सैनिकांनी नेहमीच आपल्या जिवाची बाजी लावण्यासाठी तयार असले पाहिजे.तसेच देशावर येणार्या नैसर्गिक संकटांच्या वेळी देखील भारतीय सैनिकांनी मदत व बचाव कार्यात नेहमीच मोलाची कामगिरी केली आहे.अखौरा ड्रील स्क्वेअर मैदानावर गुरूवारी सकाळी आयो जित दीक्षांत परेड मध्ये रिक्रुट जवानांनी देशसेवेची शपथ घेतली.परेड एडज्युटंट मेजर रविकुमार यांच्या नेतृत्वात युवा सैनिकांनी देशसेवेची शपथ घेतली.36 आठवड्याचे खडतर ट्रेनिंग दरम्यान सर्वात चांगली कामगिरी करणा र्या रिक्रुट हेमंत बिष्त याला जनरल सुंदरजी गोल्ड मेडल,रिक्रुट निरज शर्मा याला जनरल डिसुजा सिल्वर मेडल व रिक्रुट कविंदर पालियाल याला जनरल पंकज जोशी ब्रांझ मेडल देऊन गौरविण्यात आले.एमआयआरसी मध्ये 36 आठवड्यांचे प्रशिक्षण केल्यानंतर हे नौजवान सैनिक आता आपल्या बटालियन मध्ये दाखल होण्यापूर्वी प्रगत तांत्रिक प्रशिक्षणदेखील प्राप्त करणार आहेत.
COMMENTS