Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर उपकेंद्रात मिळणार स्थलांतरण प्रमाणपत्र

लातूर प्रतिनिधी - पदवी व पदव्युत्तर व इतर शिक्षणासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छितात अथवा प्रवेश घे

पंजाबमध्ये गोळीबार केला आणि शिर्डीत येऊन लपला…
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यास पुन्हा लॉकडाऊन : उपमुख्यमंत्री
उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दुसर्‍या दिवशी तपासणी!

लातूर प्रतिनिधी – पदवी व पदव्युत्तर व इतर शिक्षणासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छितात अथवा प्रवेश घेतलेला असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रस्तुत विद्यापीठाच्या स्थलांतरण प्रमाणपत्राची (मायग्रेशन) आवश्यकता असते. त्याशिवाय इतर विद्यापीठामध्ये प्रवेश कायम होत नाही. ही बाब लक्षात घेता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्रात आता स्थालांतर प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
स्थलांतर प्रमाणपत्रासाठी लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मरावाडा विद्यापीठात जाऊन स्थलांतरण प्रमाणपत्र हस्तगत करावे लागत होते. विद्यार्थ्यांना होणारा त्रास आर्थिक भुर्दंड तसेच विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे यासाठी विद्यापीठ प्रशासनाने दि. 14 जुलै 2023 रोजी परिपत्रक काढून स्थलांतर प्रमाणपत्र (मायग्रेशन प्रमाणपत्र) नांदेड ऐवजी लातूर येथील प्रस्तुत विद्यापीठाच्या उपपरिसर येथे स्थलांतरण प्रमाणपत्र हस्तगत करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. असे डॉ. दिगंबर नेटके, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड यांनी कळविले आहे. स्थलांतरण प्रमाणपत्र उपकेंद्र लातूर येथे मिळणार असल्याचे परिपत्रक डॉ. दिगंबर नेटके यांनी आधी सभा सदस्य धनराज जोशी अ‍ॅड. युवराज पाटील, अ‍ॅड. निखिल कासनाळे यांना दिले.

COMMENTS