Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात भाजपने केली 70 नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा

मुंबई ः भाजपने आगामी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची मोर्चेबांधणी जोमाने सुरू केली आहे. त्याचवेळी बुथ क

अधिवेशनाचे सत्र असंवैधानिक ; राज्यघटनेच्या चिंधड्या | LokNews24
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी संगीत आखाडी (बोहडा) लिंगदेव गावामध्ये मध्ये संपन्न
अजित दादा म्हणतात… महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत, सरकार पडण्याचा प्रश्नच नाही…

मुंबई ः भाजपने आगामी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची मोर्चेबांधणी जोमाने सुरू केली आहे. त्याचवेळी बुथ कमिट्या सक्रिय करून त्यांच्याकडून काम करून घेण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या पाहिजेत, यासाठी पदाधिकार्‍याच्या नेमणूका देखील जोमाने करण्यात येत आहे. भाजपने राज्यातील 70 नव्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक केल्यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे.
भाजपच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून नव्या 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. भाजप केंद्रासह राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे या पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्षपदास चांगलेच वलय प्राप्त झाले आहे. आगामी लोकसभा, विधानसभासह आगामी होणार्‍या स्थानिक निवडणुका लक्षात घेता जिल्हाध्यक्षपद अधिकच वजनदार बनले आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडावी, यासाठी इच्छुक चांगलेच कामाला लागले होते. तर, जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात कोणाला संधी मिळाली आहे. भाजप जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकार्‍यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे.

COMMENTS