Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

नाशिक - प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी शासनाने 31 जुलै 2023 मुदत  दिली आहे. परंतु शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेपर्यंत वा

आर.आर. माने यांना संत सेवा पुरस्कार प्रदान
श्री स्वामीचे अनुभव | Shri Swami Samarth Maharajanche Anubhav
जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने 3 जून रोजी रक्तदान शिबीर

नाशिक – प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी शासनाने 31 जुलै 2023 मुदत  दिली आहे. परंतु शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेपर्यंत वाट न पाहता तातडीने पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कृषि विभाग व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांच्या मार्फत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या पीक विमा रथास हिरवा झेंडा दाखविला.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी रोहयो नितिन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी निवडणूक शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक जगदिश पाटील, तहसिलदार परमेश्वर कासोळे, कैलास पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, बदलत्या नैसर्गिक हवामानापासून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना मदतीची आहे. यासाठी शेतकऱ्यांना www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर अथवा नजीकच्या CSC किंवा VCC सेंटरवर जाऊन केवळ एक रूपया विमा हप्ता भरून योजनेत सहभागी होता येणार आहे. उर्वरित रक्कम विमा कंपनीस शासनामार्फत अदा केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यावेळी दिली.

COMMENTS