किल्लेधारूर प्रतिनिधी - ब्रेक फेल झाल्यामुळे गोडेतेल वाहतूक करणार्या ट्रकचा अपघात झाल्याची घटना धारूर घाटात रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या स
किल्लेधारूर प्रतिनिधी – ब्रेक फेल झाल्यामुळे गोडेतेल वाहतूक करणार्या ट्रकचा अपघात झाल्याची घटना धारूर घाटात रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली . या अपघातात चालकासह मालक गंभीर जखमी झाले आहेत. अपघाता नंतर ट्रक मधील तेल रस्त्यावर आले होते .
धारूर घाटात अपघाताची मालिका मागील अनेक वर्षा पासून सुरू आहे .या अपघातात मालवाहू ट्रकचे अधिक प्रमाण आहे .घाटात अरुंद रस्ता आणि धोकादायक वळणामुळे चालकाला अंदाज येत नसल्यामुळे हे अपघात सत्र सुरू आहे .रविवारी सकाळी लातूर येथून पाथरी येथे गोडेतेल घेऊन जाणारा ट्रक एम . एच . 09 एच एच 1510 हा धारूर घाटातून जात होता .या ट्रकमध्ये 15 लिटर प्रमाणे 1 हजार 300 डबे गोडेतेल होते .अर्धा घाट उतरल्यानंतर ऐन धोकादायक वळणाच्या ठिकाणी ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले . यावेळी यावेळी ट्रक दरीत कोसळत असताना चुकून वळण घेताना डोंगराकडील बाजूस पलटी झाला .सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला .या अपघातात चालक महंमद अखिल व मालक समीर अहमद दोघे जखमी झाले .पोलिसांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते .यात ट्रक मालकाच्या हाता – पायास गंभीर मार लागला होता .अपघातानंतर ट्रक मधील गोडेतेल हे रस्त्यावर आल्यामुळे दुचाकीस्वार घसरून आणखी अपघात होण्याचे प्रकार पोलीसांच्या लक्षात आल्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस जमादार बास्टे यांनी टिप्परने डस्ट आणून रोडवर टाकण्यात आले .त्यामुळे पुढे होणारे अपघात टाळले
COMMENTS