Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयात स्वागत

बीड प्रतिनिधी - विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्याची गोडी लागावी, नियमीत तासिका कराव्यात, त्यांचा सन्मान व्हावा , यासाठी महाविद्यालयातील सर्व प

बनावट सोनेतारणात वापरला… बड्या सराफाचा शिक्का?
 दोन सराईत चोरट्यांना अटक , कोळशेवाडी पोलिसांची कारवाई
उर्फी जावेदचा भूल भुलैया लुक

बीड प्रतिनिधी – विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्याची गोडी लागावी, नियमीत तासिका कराव्यात, त्यांचा सन्मान व्हावा , यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी प्रथमदिनीच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले. येथील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील शैक्षणीक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता 11 वी   व 12 वी  कला,विज्ञान,वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम शाखेस प्रवेश घेतलेल्या  विद्यार्थ्यांचे या वर्षासाठीच्या तासिका दिनांक 17 जुलै 2023 पासून सुरू झालेल्या आहेत.
महाविद्यालयात पहिल्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांचे व सोबत आलेल्या पालकांचे नवगण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.दीपा भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर,उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,पदव्युत्तर संचालक डॉ.सतीश माऊलगे,कमवि उपप्राचार्य डॉ.एन.आर.काकडे,पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर,कनिष्ठ कर्मचारी प्रतिनिधी प्रा.ए.डी.खुटाळे व महाविद्यालयातील कनिष्ठ प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS