Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बखळे यांचा धाडसीपणा युवकांसाठी प्रेरणादायी ः प्राचार्य शेळके

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः जीवन ह संघर्ष आणि मूल्यातून आकाराला येते. यादृष्टीने प्राचार्य डॉ. सुखदेव बखळे यांचे व्यक्तिमत्व म्हणजे कष्ट,सेवा, ज्ञानार

महात्मा बसवेश्‍वर आणि कर्मवीर अण्णा यांचे विचार रुजले पाहिजेत ः प्राचार्य शेळके
गुणवत्ता आणि संस्कार हीच शिक्षणाची खरी ओळख ः प्राचार्य शेळके
विवेकी उपक्रमशीलता नव्या उपक्रमाला जन्म देते ः प्राचार्य शेळके

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः जीवन ह संघर्ष आणि मूल्यातून आकाराला येते. यादृष्टीने प्राचार्य डॉ. सुखदेव बखळे यांचे व्यक्तिमत्व म्हणजे कष्ट,सेवा, ज्ञानार्जन,पत्रकारिता क्षेत्रात समर्पित होताना त्यांचा धाडशीपण ह सद्गुण आजच्या युवकांना प्रेरणादायी असल्याचे मत अ‍ॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले.
   येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान, विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, आनंदयात्री सामाजिक विचार मंच यांच्यातर्फे प्राचार्य डॉ.सुखदेव बखळे यांच्या सेवाभावी कार्याबद्दल पासष्ठव्या पदार्पण वाढदिवसाच्याप्रसंगी सन्मान करताना प्राचार्य टी. ई. शेळके बोलत होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.यावेळी माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, सुखदेव सुकळे, प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी विविध शिक्षण शाखा, पुणतांबा, कोपरगाव, श्रीरामपूर,फुलंब्री इत्यादी ठिकाणच्या प्राचार्य डॉ. बखळे समवेतच्या आठवणी सांगून एक प्रांजळ व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा गौरव केला. ’बाबुराव पासष्टी ’व इतर पुस्तके देऊन सर्वांचा सन्मान केले. यावेळी श्रीमती झेलाबाई बखळे, सुनीताताई बखळे, प्रतीक बखळे आदी उपस्थित होते.प्राचार्य शेळके यांनी रयत शिक्षण संस्था म्हणजे सेवाभावाचा आदर्श आहे. संस्थेतील सेवक हा आदर्श जपतात, त्यामुळे जनतेत संस्था आदर आहे,हा आदर्श जपणारे प्राचार्य डॉ. बखळे यांनी संयम आणि प्रामाणिकपणे जीवन घडविले, हा आदर्श आजच्या युवकांनी  जपला पाहिजे, असे सांगितले. प्राचार्य डॉ. बखळे यांनी असा गुरुवर्यांचा लाभलेला आशीर्वाद आणि जीवनप्रेरणा माझ्या सत्कार्याला बळ देईल, अशा भावना व्यक्त केल्या. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर सुनीताताई बखळे यांनी आभार मानले.

COMMENTS