Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निमा स्टूडेंट फोरम महाराष्ट्र अध्यक्षपदी डॉ. सागर कारंडे 

निमा महाराष्ट्र राज्य स्डुडन्ट फोरमचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न

नाशिक: निमा महाराष्ट्र राज्याची २०२२-२०२४ ची पहिली कार्यकारणी सभा बुलढाणा येथे नुकतीच संपन्न झाली. त्या सभेमध्ये नॅशनल  इंटीग्रेटेड मेडीकल असोसिए

अवैध धंदे करणार्‍यांच्या मुसक्या आवळा, अन्यथा शहरात गँगवार होतील
आ. जयंत पाटील यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क
घरकाम करणार्‍या महिलांसाठी स्टार्ट अप

नाशिक: निमा महाराष्ट्र राज्याची २०२२-२०२४ ची पहिली कार्यकारणी सभा बुलढाणा येथे नुकतीच संपन्न झाली. त्या सभेमध्ये नॅशनल  इंटीग्रेटेड मेडीकल असोसिएशन (निमा) स्टूडेंट फोरम – राज्य शाखेचा पदग्रहण सोहळा आमदार संजय गायकवाड तसेच निमा सेंट्रल शाखा पदाधिकारी व निमा महाराष्ट्र शाखा पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी निमा स्टूडेंट फोरम महाराष्ट्र अध्यक्षपदी डॉ. सागर कारंडे ( नाशिक), सचिव-डॉ.अक्षय गांधी( सोलापुर), कोषाध्यक्ष- डॉ.संकेत झाडे ( चंद्रपुर) यांच्यासह इतर कार्यकारिणी सदस्यांना पदभार सुपूर्त करण्यात आला.

सदर पदग्रहण सोहळ्यात निमा सेंट्रल शाखेचे डॉ. आशुतोष कुलकर्णी ( अध्यक्ष- निमा भारत) , डॉ. शांतीलाल शर्मा (कोषाध्यक्ष) तसेच डॉ विनायक टेंभूर्णीकर, डॉ. गजानन पडघन, डॉ. सौ. वैशाली पडघन , डॉ. शैलेश निकम , डॉ. पवन सोनवणे तसेच निमा महाराष्ट्र शाखा अध्यक्ष- डॉ. तुषार सूर्यवंशी, सचिव- डॉ. मोहन येंडे, कोषाध्यक्ष- डॉ. सोपान खर्चे यांनी नवनियुक्त स्टूडंट फोरम पदाधिका-यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हे निमा बुलढाणा शाखा यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडले. पद्ग्रहण सोहळ्यास मोठ्या संख्येने सभासद महाराष्ट्रातून उपस्थित होते.

COMMENTS