Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात दोन उपसरपंच पद्धत लागू करा

माजी सरपंचांची मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः देशातील अनेक राज्यांमध्ये आता नाराज नेत्यांना मुख्यमंत्रिपद देण्याऐवजी उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लावण्याची पद्धत रूढ होता

त्या निकालाचे न्यायालयाने मूल्यमापन करावे; सीबीआय संचालक मुदतवाढ याचिका
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा  

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः देशातील अनेक राज्यांमध्ये आता नाराज नेत्यांना मुख्यमंत्रिपद देण्याऐवजी उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लावण्याची पद्धत रूढ होतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर उत्तरप्रदेशानंतर महाराष्ट्रात देखील दोन नेत्यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे एका माजी सरपंचाने दोन उपसरपंच नेमण्याची अजब मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका माजी सरपंचाने ही मागणी केली आहे.
ज्याप्रमाणे राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी दोन उपसरपंच निवड पद्धत लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. वैजापुर तालुक्यातील मनूर येथील माजी सरपंच राजीव सुदामराव साळुंके यांनी ही मागणी केली आहे. राजीव साळुंके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जसे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांची निवड करू शकता, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रत्येक गावात दोन उपसरपंच निवडीची परवानगी द्यावी. गावाच्या विकासासाठी सरपंचाला समर्थन देण्यासाठी व त्यांच्याकडून गावाचे काम करून घेण्यासाठी उपसरपंच हा महत्त्वाचा असतो. आपण केलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवडीच्या धर्तीवर आता गावाच्या भल्यासाठी दोन उपसरपंच निवड करता यावी. त्यामुळे यावर सकारात्मक चर्चा करून, कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी विनंती यावेळी निवेदनात करण्यात आली आहे.

COMMENTS