Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ध्येयपूर्ती मुलाचे वस्तीगृहातून सुरज बलवत कोणालाही न सांगता हिरापूरच्या पुलाजवळ पोहोचला

महामार्गावरील पोलिसांनी केले घरच्यांच्या स्वाधीन

गेवराई प्रतिनिधी- बीड येथील धानोरा रोड वरील ध्येयपूर्ती मुलांचे वस्तीगृहातून दि. 6 जुलै रोजी सुरज बाळवत हा एकटाच बाहेर पडला व गेवराई कडे येत असत

कुरघोडी करण्याऱ्या चीनला खडसावले
पेगॅसीस प्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन
चितळसर पोलिसांची कारवाई, घरफोड्या करणाऱ्या तिघांना अटक 

गेवराई प्रतिनिधी- बीड येथील धानोरा रोड वरील ध्येयपूर्ती मुलांचे वस्तीगृहातून दि. 6 जुलै रोजी सुरज बाळवत हा एकटाच बाहेर पडला व गेवराई कडे येत असताना हिरापूर येथील पुलाजवळ महामार्ग पोलिसांच्या नजरेस पडला. त्यांनी त्याची विचारपूस करून त्याला घरच्यांच्या स्वाधीन केले.
टोल नाक्यावरील महामार्ग पोलीस एपीआय कपुरे सोबत पोलीस हवालदार तांदळे, सोळुंके, पठाण, बांगर, राठोड चौगुले असे दिवस पाळी ड्युटी करत असताना एन एच 52 वर पेट्रोलिंग करत असताना हिरापूर पुला जवळ 6:30 वाजण्याच्या सुमारास एक मुलगा हा बीड करून गेवराईकडे पायी चालत येत असताना त्यांना दिसला सदरच्या मुलाला महामार्ग पोलिसांनी थांबून त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरत नितेश बलवत वय 11 वर्षे राहणार खेर्डा तालुका माजलगाव जिल्हा बीड असे सांगितले. सदरचा मुलगा हा बीड येथील ध्येयपूर्ती मुलाचे वस्तीगृह धानोरा रोड बीड येथून कोणालाही न काही सांगता निघून आलेला होता. त्या मुलाला महामार्ग पोलिसांनी पाडळसिंगी टोल नाका येथे टॅपला घेऊन गेले व सदर मुलाचे वडील यांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून त्यांना टॅपला बोलून घेऊन त्या मुलाला त्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या अतिदर्शतेमुळे सुरज सुखरुप घरी पोहचला.

COMMENTS