Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आत्महत्याग्रस्त शेतकरी जोगदंड कुटुंबाचे दोन चिमुकल्यासह आमरण उपोषण

अंबाजोगाई प्रतिनिधी - केज तालुक्यातील येवता येथील सचिन जोगदंड यांच्या स्व मालकीच्या शेत जमिनीवर बसवर यांनी अर्जुन जोगदंड यांच्याशी संगममत करुन म

२०व्या ‘महाटेक २०२४’ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाची ०८ फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात 
धावती रेल्वे पकडताना महिलेचा घसरला पाय अन्…
नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्नशील

अंबाजोगाई प्रतिनिधी – केज तालुक्यातील येवता येथील सचिन जोगदंड यांच्या स्व मालकीच्या शेत जमिनीवर बसवर यांनी अर्जुन जोगदंड यांच्याशी संगममत करुन मागील अनेक वर्षांपासून जमिनीवर अनधिकृत कब्जा केला असून जमीन मिळावी यासाठी अनेक विनवण्या शासन दरबारीं पाठपुरावा करुन सुद्धा न्याय न मिळाल्याने सुभाष जोगदंड यांनी आत्महत्या केली तसेच 15  जून रोजी शारदाबाई सुभाष जोगदंड या आमचं शेत आम्हांला द्या अशी मागणी करताच त्याना बसवर बंधू व अर्जुन जोगदंड यांनी शिवीगाळ करत मारहाण केली हा धक्का सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. जोगदंड कुटुंबाची शेती शिवाय दुसरे उपजीविकिचे साधन नसल्याने जोगदंड कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सोमवार दि.3 जुलै पासून सचिन जोगदंड यांच्या सह त्यांची पत्नी लहान मुले व कुटुंब त्यांच्या आई वडिलांच्या आत्महत्येस कारणीभूत आरोपीवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी तसेच महसूल प्रशासनाने स्पॉट पंचनामा करुन शेत ताब्यात द्यावे यासाठी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी दखल घेत स्थानिक प्रशासनास कारवाई करण्याचे पत्र दिले असताना महसूल व पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. अंबाजोगाई चे उपजिल्हाधिकारी या प्रकरणी लक्ष घालून जोगदंड कुटुंबास न्याय मिळवून देणे गरजेचे आहे जोगदंड कुटुंबातील दोन बळी तर गेलेच आहेत मात्र यापुढे असे होऊ नये याची दक्षता घ्यावी अन्यथा सर्वस्वी जबाबदारी स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाची असेल.आमरण उपोषणास बसलेल्या जोगदंड कुटुंबाची मा. नगरसेवक अमोल लोमटे व शिवसंग्राम तालुकाध्यक्ष धनेश गोरे यांनी उपोषण स्थळी भेट देत पाठिंबा दर्शीवला.

COMMENTS