Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमोल कोल्हेंची शरद पवारांसोबत असल्याची घोषणा

पुणे/प्रतिनिधी ः अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी रविवारी मंत्रीप

धक्कादायक ! बस चालकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार
पाच हजार कोटींची जागा अदानींना देण्याचा डाव – राजेश शर्मा
प्रदर्शनाच्या आधी सुभेदार चित्रपटाचा रेकॉर्ड

पुणे/प्रतिनिधी ः अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जारी केला. त्यानंतर अजितदादांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार-खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. पण त्यानंतर दुसर्‍याच दिवशी खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट करत अजित पवारांना जोरदार धक्का दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेत. त्यांच्या या कृतीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवारांच्या या भूमिकेला पक्षाच्या किती आमदारांचा पाठिंबा आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्यांच्या शपथविधीला उपस्थित असणारे काही लोकप्रतिनिधी पुन्हा शरद पवारांच्या तंबूत परत येत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांच्या रविवारच्या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यानंतर कोल्हेंचा सुधीर मुनगंटीवार यांच्या पाया पडण्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यामुळे कोल्हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या गटात सहभागी झाल्याचा दावा केला जात होता. पण आज एका ट्विटद्वारे अमोल कोल्हेंनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट केले. या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. अमोल कोल्हेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत ’साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण’ हे वाक्य आहे. त्यापुढे त्यांच्या मालिकेतील एक चित्रफित आहे. ’इथे सगळे विसरायचे, पण बाप नाही विसरायचे. त्याला भेटल्याने, जवळ बसल्याने, मायेने विचारपूस केल्याने तो कणसाळतो, कोंबारतो. त्याला नाही विसरायचे. त्याच्या चेहर्‍यावरच्या सुरकुत्यांमध्ये आपण सुख होऊन वाहायचे’, असे कोल्हे या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसून येत आहेत. दुसरीकडे, एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोल्हेंनी आपल्याला शपथविधीची कोणतीही कल्पना नसल्याचा दावा केला आहे. मी शरद पवारांसोबतच आहे. मी त्यांना भेटून सविस्तर माहिती देईल. मी काल एका वेगळ्या कामासाठी गेलो होतो. मला शपथविधीची कल्पना नव्हती, असे ते म्हणाले.

COMMENTS