Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धायगुडा पिंपळा शिवारात आयशर टँम्पो चालकास लुटले ; चालकावर तलवारीने केले वार

तिघांपैकी एक जणास ग्रामस्थांनी पकडले; ग्रामिण पोलिसांत गुन्हा दाखल

अंबाजोगाई प्रतिनिधी - अहमदपुरकडून येणार्या आयशर टॅम्पोचा चालक धायगुडा पिंपळा ते परळी रोडवरील दुरदर्शन केंद्राजवळ आला असता त्याने टेम्पो थांबवला

राणा दाम्पत्यांचा वारीमध्ये सहभाग
आमदार रोहित पवार क्रिकेटच्या मैदानात
महाराष्ट्राला गुन्हेगारीचा विळखा !

अंबाजोगाई प्रतिनिधी – अहमदपुरकडून येणार्या आयशर टॅम्पोचा चालक धायगुडा पिंपळा ते परळी रोडवरील दुरदर्शन केंद्राजवळ आला असता त्याने टेम्पो थांबवला व तो लघुशंकेसाठी गेला असता शाईन गाडीवर आलेल्या तिघा जणांनी या चालकास तलवारीने वार करून त्याच्या जवळील एक हजार रूपये घेवून पोबारा केला. ही घटना शुक्रवार, दि. 30 जून रोजी  सायंकाळी 7.30 वाजता घडली. तिघांपैकी शुभम प्रकाश जाधव (रा.काळेगाव, ता.अहमदपूर) या एकाला ग्रामस्थांनी पकडले होते. पकडलेल्या या एकासह एकूण  तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
जखमी चालकाने धायगुडा पिंपळा येथील सय्यद आफरोज याला माहिती दिल्यानंतर त्याने मित्रांसमवेत त्या तीन चोरट्यांची दुचाकी आडवली. परंतु, यातील दोघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर ग्रामस्थांनी शिताफीने एक जणाला पकडून ग्रामिण पोलिसांच्या हवाली केले, असून या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता घडली. घटनेची हकीकत अशी की, अहमदपुरकडून येणार्या (एम.एच.44.यु.0992) या आयशर टेम्पोवर चालक म्हणून वरवटी येथील जनार्धन उत्तम उघडे हे होते. टेम्पोमध्ये लिक्वीड भरले होते. ते गावी जात होते. पिंपळा धायगुडा येथून परळीकडे जाणार्या रस्त्यावरील दुरदर्शन केंद्रानजीक उघडे हे टेम्पो रोडलगत उभे करून लघुशंकेसाठी खाली उतरले असता अचानक शाईन दुचाकी गाडीवरून आलेल्या तिघाजणांनी उघडे यांच्यावर चाकु व तलवारीने वार करण्यास सुरूवात केले. संबंधित चालकाने मारहाण करू नका, अशी विनवणी केली. तरी त्यातील एक जणाने बळजबरीने खिशातील एक हजार रूपये व मोबाईल हिसकावून घेत चाकूने पायावर वार केले. आणि तिघेजण विनानंबरच्या शाईन गाडीवर धायगुडा पिंपळा गावाच्या दिशेने निघुन केले. चालक उघडेच्या मित्रामुळे यातील एक जण सापडला असला तरी अन्य दोघे जण पळून गेले आहेत. ग्रामिण पोलिसांनी या आरोपींसह त्याच्याकडील दुचाकी, एक चाकु, मोबाईल व एक हजार रूपये जप्त केले आहेत. आरोपींच्या विरोधात ग्रामिण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेंद्र घुगे हे करीत आहेत.

COMMENTS