Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

मुंबई ः मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बुधवारी दिवसभर  पावसाचा जोर कायम होता. या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांच्या पाणीसाठ्य

द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; राष्ट्रपतीपदी प्रथमच आदिवासी महिला
उसतोड कामगारांना प्रतिटन सातशे रूपये भाव द्यावा
आता हमीभावासाठी शेतकर्‍यांचा लढा

मुंबई ः मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बुधवारी दिवसभर  पावसाचा जोर कायम होता. या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांच्या पाणीसाठ्यात 24 तासात 1.68 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात धरणांमध्ये काल 7.26 टक्के पाणीसाठा होता. तर 24 तासात झालेल्या मुसळधार पावसानंतर हाच पाणीसाठा 8.94 टक्के झाला आहे. मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारे 7 धरण आणि भातसा धरणातील शिल्लक पाणीसाठा मिळून मागील 24 तासात 12.57 टक्क्यांहून वाढून 14.61 टक्के झाला आहे.

COMMENTS