Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेची धावत्या रिक्षात गळा चिरून हत्या

साकीनाका परिसरातील घटनेने मुंबईत खळबळ

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचा दर सातत्याने चढता राहतांना दिसून येत आहे. मुंबईतील मीरा रोड येथील सरस्वती वैद्य

छ.संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती
परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या !
पिंपरी चिंचवड हादरलं !

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचा दर सातत्याने चढता राहतांना दिसून येत आहे. मुंबईतील मीरा रोड येथील सरस्वती वैद्य या तरूणीची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच, साकीनाका परिसरात धावत्या रिक्षात विवाहित महिलेची धावत्या रिक्षात गळा चिरून हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू केली आहे. दीपक बोरसे असे आरोपीचे नाव असून मृत महिलेशी त्याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी दीपकने स्वत:वरही हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मीरा रोड आणि मरीन ड्राईव्ह येथील हत्येच्या घटनेनंतर आता मुंबईत ही तिसरी हत्येची घटना घडल्याने राजधानीत खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या साकीनाका परिसरात राहणार्‍या रिक्षाचालक दीपक बोरसे याचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. दोघे रिक्षात बसून खैराणी रोडवरून जात असताना दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या दीपकने महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत जखमी केले. त्यानंतर महिलाच घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर दीपकनेही स्वत:वर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. महिलेची हत्या झाल्याची माहिती समजताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. आरोपी दीपक बोरसेला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. साकीनाका, मुंबई येथे एका महिलेचा भररस्त्यात गळा चिरून खून करुन आरोपी पसार झाला. हि अतिशय संतापजनक घटना आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगार मोकाट असून नागरीक दहशतीखाली आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून मुंबईत आरोपी रिक्षाचालक महिलेची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

प्रेमसंबंधातून हत्या – मृत महिला ही विवाहित असून तिला एक मुलगा आहे. पतीशी पटत नसल्याने ती गेल्या अनेक दिवसांपासून माहेरी राहत होती. त्यानंतर तिचे दीपक बोरसे या रिक्षाचालकाशी प्रेमसंबंध जुळले होते. परंतु धावत्या रिक्षात दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपी दीपकने महिलेची हत्या केली आहे.

COMMENTS