Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दर्शना पवारचा खून झाल्याचे स्पष्ट

शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट ः मृतदेहावर आढळल्या जखमा

पुणे/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील असेलेली आणि राज्य लोकसेवा आयोची परीक्षा उत्तीर्ण होवून वन अधिकारी झालेल्या दर्शना पवार य

लोकसभेच्या आचार संहिता काळात घातपाताचे ई-मेल ?
पुणतांब्यातील 17 कोटी रूपयांच्या पाणी योजनेतील त्रुटी दूर कराव्यात
वळणला गावठी कट्टा तर गंगापुरला तलवार बाळगणार्‍या दोघांना अटक

पुणे/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील असेलेली आणि राज्य लोकसेवा आयोची परीक्षा उत्तीर्ण होवून वन अधिकारी झालेल्या दर्शना पवार या 26 वर्षीय तरूणीचा मृतदेह राजगड तालुक्याच्या पायथ्याशी आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. कालच दर्शना पवारचा श्‍वविच्छेदन अहवाल समोर आला असून, तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.
रविवारी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती मिळाली आहे. दर्शना पवार हिचा मृत्यू सामान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहे. यामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट केले आहे. या अहवालानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या खून प्रकरणात दर्शनाच्या मित्रावर संशयाची सूई जात आहे. तो दर्शनासोबत होता. परंतु अजूनही बेपत्ता आहे. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी 18 जून रोजी दर्शना दत्तू पवार हिचा मृतदेह सापडला. रविवारी सकाळी राजगडच्या पायथ्याशी हा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु दर्शनाचा मित्र राहुल संपर्कात अजूनही नाही किंवा त्याचा पत्ताही लागला नाही. दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला साधारण 8 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहचले. त्यानंतर दोघांनीही गड चढायला सुरुवात केली. हे सर्व उउढत फुटेजमध्ये दिसले. फुटेजमध्ये दोघेही राजगडावर जाताना दिसत आहेत. मात्र त्यानंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत आला. त्याचे मोबाइलचे लोकेशन परराज्यात दिसत आहे. त्यानंतर तो बेपत्ता आहे? राहुल नेमका कुठे आहे? याचा शोध पोलिस घेत आहेत.

राहुलच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना – दर्शनाचा खून झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी 5 पथके तयार केली आहेत. दर्शनाचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाली आहे. दर्शना 9 जून रोजी पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमासाठी स्पॉट लाईट कॅडमी येथे आली होती. 11 जून सायंकाळी चार वाजेपर्यंत घरच्या मंडळीच्या संपर्कात होती. मात्र 12 रोजी दर्शनाने फोन उचलले नाहीत. यामुळे कुटुंबियांनी स्पॉट लाईट अ‍ॅकॅडमी येथे येऊन तिची चौकशी केली. त्यावेळी सांगण्यात आले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे हिच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत.

COMMENTS