Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणुका घेण्याची सरकारला भीती

उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिका विसर्जित होवून तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटला असला तरी, निवडणुका घेण्याची हिंमत या बेकायदेशीर सरकारमध्ये नाही,

विधानपरिषदेवरून काँगे्रस-ठाकरे गटात जुंपली
मराठा आरक्षणाचा प्रश्‍न राज्यात नव्हे केंद्रात सुटेल
हुकूमशाही दारापर्यंत पोहोचली

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिका विसर्जित होवून तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटला असला तरी, निवडणुका घेण्याची हिंमत या बेकायदेशीर सरकारमध्ये नाही, सरकारला निवडणुका घेण्याची भीती वाटत असल्याची घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, या सरकारकडून पैसा उधळला जातो आहे, जाब विचारणारे कुणी नाही. पावसाप्रमाणे निवडणुकाही लांबत चालल्या आहेत असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे. मुंबईला कुणी मायबापच राहिलेला नाही. जे काही सुरु आहे ते लुटालूटच आहे. शिवसेना आता महापालिकेवर 1 जुलैच्या दिवशी विराट मोर्चा काढणार आहे अशीही घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. मुंबई महापालिकेच्या ठेवींमधूनच विकासकामे केली जात आहेत. आत्तापर्यंत बराच पैसा याच एफडींमधून वापरला गेला आहे. हा सगळा जनतेचा पैसा आहे. या जनतेच्या पैशांच्या लुटीचा हिशोब द्यावाच लागेल. 1 जुलैला आम्ही विराट मोर्चा काढणार आहोत. मुंबईकरांच्या मनातल्या असंतोषाला आम्ही वाचा फोडणार आहोत. या सगळ्यांना जाब विचारणारे कुणी नाही. एक काळ असा होता की मुंबई महापालिका ही 650 कोटी तुटीत होती. आता 92 हजारांच्या ठेवीपर्यंत ही मुंबई महापालिका गेली आहे. हे सगळे पैसे महापालिकेच्या ठेवी होत्या. कोस्टल रोड, जनतेच्या उपयोगाची कामे सुरु होती. आता कोणतेही काम असेल तरीही महापालिकेचा पैसा बेधडकपणे वापरला जातो आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृ्त्त्वात हा मोर्चा निघणार असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

अडवाणींनी जिन्नांच्या कबरीवर डोके का टेकवले होते – राज्यात औरंगजेबावरून राजकारण तापले आहे. यातच वंचितचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली होती, यावर उद्धव ठाकरेंना विचारले असते ते म्हणाले की,  जेव्हा आमची युती (शिवसेना-भाजपा) होती. तेव्हा लालकृष्ण अडवाणी साहेब (भाजपाचे ज्येष्ठ नेते) जिन्नाहच्या (मोहम्मद अली जिन्ना) कबरीवर गेले होते. तसेच नवाज शरीफच्या वाढदिवसाच्या दिवशी आपले पंतप्रधान केक खायला गेले होते. त्यामुळे मला असे वाटते की आपण स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. मला असे वाटते, लोकांना आता इतिहासात अडकवून ठेवण्यााऐवजी नव्या विचारांसह पुढे जावे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

तुम्ही 15-20 वर्ष दरोडा टाकला त्याचे काय ः शिंदेंचा पलटवार – दरोडा टाकणार्‍यांनी चोरीची भाषा करणे हे त्यांच्या तोंडून शोभत नाही. गेले पंधरा वीस वर्ष महापालिकेवर दरोडा टाकला मुंबई महापालिकेची हजारो कोटी कुठे गेले याचा हिशोब या गाथा विचारणार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसआयटी डिक्लेअर झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु दिशाभूल होणार नाही दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि यातून उलटा चोर कोतवाल को दाटे असा विषय आहे.  कॅगच्या ताशेरांवर एसआयटी लावलेली आहे. ती निपक्षपाती पणे काम करेल. कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन कुठलीही चौकशी होणार नाही. निपक्षपाती पणे जे केले त्याबाबतीत एसआयटी चौकशी करेल आणि या मुंबईकरांचा पैसा जो आहे, हा मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्या तिजोरीत राहायला पाहिजे. तो कुणालाही इकडे तिकडे वळवता येणार नसल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

COMMENTS