केज - मागील पन्नास वर्षापासून दलित भूमिहीन समाज गायरान जमिनीवर अतिक्रमण करून त्या कसत आहेत व कुटुंबाची उपजीविका करीत आहे म्हणून आमचा त्या जमिनीवर
केज – मागील पन्नास वर्षापासून दलित भूमिहीन समाज गायरान जमिनीवर अतिक्रमण करून त्या कसत आहेत व कुटुंबाची उपजीविका करीत आहे म्हणून आमचा त्या जमिनीवर हक्क आहे अतिक्रमण हटविण्यासाठी दिलेल्या नोटीसा हे एक षडयंत्र असून आम्ही ते हाणून पाडू असा खणखणीत ईशारा रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनी दिला तर दलीत अन्याया अत्याचारा विरुद्ध ठोस भूमिका घेत नसतील तर आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही इशारा तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी संघर्ष मोर्चाचे सत्ताधार्यांना दिला.
गायरानधारक भूमिहीन यांच्या हक्कासाठी आणि नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी रिपाइं (आठवले) च्या वतीने दि. 12 जून रोजी दीपक कांबळे, जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड, मजहर खान, मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, रमेश निशिगंध, शहराध्यक्ष भास्कर मस्के, सरचिटणीस गौतम बचुटे, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, विकास आरकडे, विकास आरकडे, निलेश ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयावर आज भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला. डॉ बाबासाहेब चौकातून निघालेला मोर्चा मंगळवार पेठ, बस स्टँड शिवाजी चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चात जनविकासचे रमेश भिसे, मिलिंद वाघमारे, कैलास जावळे, मिलिंद भालेराव, मसू बचुटे, संभाजी हजारे, राहुल बचुटे, रुपचंद ढालमारे, जय जोगदंड, प्रकाश घाडगे या प्रमुख कार्यकर्त्यांसह तालुक्यातील गायराणधारक आणि कार्यकर्ते हातात निळे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर येताच मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी बोलताना राजू जोगदंड म्हणाले की, निझाम सरकार पासून भूमिहीन गायरान जमिनी कसत आहेत. ना रामदास आठवले राज्यात मंत्री असताना अनेक गायरान जमिनी कास्तकर्यांच्या नावे झाल्या आहेत शासनाने आता सन 2005 पर्यंत कसत असलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमनुकूल करण्यासाठी नवीन अद्यादेश काढावा. यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे हे अग्रही आहेत. त्यांच्या लढ्याला यश येणार आहे. तर दीपक कांबळे यांनी दलित अन्याय अत्याचार संदर्भात लक्ष वेधताना म्हणाले की, जर आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आंचत समाजावरील हल्ले रोखण्यासाठी आणि आमच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ मिळत नसेल तर आगामी काळात आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. असा इशारा दिला. यावेळी तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, अजहर खान, रमेश भिसे, गौतम बचुटे आणि दिलीप बनसोडे यामचेहो भाषणे झाली.
COMMENTS