Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरातील 4200 घरांमध्ये डेंग्यू डासाच्या अळ्या

लातूर प्रतिनिधी - लातूर शहर महानगरपालिकेने दि. 11 ते 30 ते या कालावधीत ‘स्वच्छ छत व स्वच्छ घरडेंग्युमूक्त परिसर’ ही मोहीम राबविण्यात आली. यात 20

जि.प., लातूर पं. स. च्या मुल्यांकनाची तपासणी
औसा बाजार समितीचे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर
‘आवर्तन’चा शतकपूर्ती संगीत महोत्सव 24 व 25 जून रोजी लातुरात

लातूर प्रतिनिधी – लातूर शहर महानगरपालिकेने दि. 11 ते 30 ते या कालावधीत ‘स्वच्छ छत व स्वच्छ घरडेंग्युमूक्त परिसर’ ही मोहीम राबविण्यात आली. यात 20 दिवसांत शहरातील 83 हजार 72 घरांना भेटी देण्यात आल्या असून त्यातील 4 हजार 200 घरांमध्ये डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्या आाहेत.
‘स्वच्छ छत व स्वच्छ घरडेंग्युमूक्त परिसर’ मान्सूनपूर्व मोहीमेत दुषित आढळून आलेली 4 हजार 200 घरे, सर्व शाळा, महाविद्यालये यांनी शाळा चालू होण्यापूर्वी सांडपाण्याच्या व पिण्याच्या सर्व टाक्या साफ करुन घेणे आवश्यक आहे. छतावरील, प्रांगणातील उघड्यावरील निरुपयोगी साहित्यात पावसाचे पाणी साचून त्यात होणा-या एडीस एजिप्ती डासची पैदास रोखता यावी व शहरामध्ये पावसाळ्यात डेंग्यु तापीचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून मनपामार्फत ‘स्वच्छ छत व स्वच्छ घरडेंग्युमूक्त परिसर’ ही मोहीम राबविण्यात आली. सदरील मोहीमेतील 20 दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण 83 हजार 72 घरांना भेटी देण्यात आल्या. यापैकी एकूण 4 हजार 200 घरामध्ये एडीस एजिप्ती डासाच्या अळ्या आढळून आल्या. ज्या पाणीसाठ्यात डासअळी आढळून आल्या त्या ठिकाणचे पाण्यामध्ये ऍबेट औषध टाकण्यात आले आहे. यापुढे पाणीसाठे झाकून ठेवणेबाबत आवश्यक सुचना संबंधित नागरिकांना देण्यात आल्या आहेत. संबंधित घरांना पुढील आठ दिवसात परत भेटी देण्यात येणार आहेत आणि दिलेल्या सुचनांची पूर्तता केली आहे का याची खात्री मनपा कर्मचा-यांमार्फत करण्यात येणार आहे. सर्व शाळांना त्यांच्या सांडपाण्याच्या टाक्या तसेच विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या धुवून घेणे बाबत गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फत सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांनाही एमआयडीसी कार्यक्षेत्रातील सर्व कारखान्यांच्या प्रांगणात उघड्यावर पडलेल्या मशीनरी, साहित्य शेडखाली झाकून ठेवण्याच्या सुचना सर्व उद्योजकांना देणेबाबत कळविण्यात आले आहे. पावसाळा चालू होण्यापूर्वी आपल्या घराच्या छतावरील, प्रांगणातील निरुपयोगी साहित्य काढून घ्यावे. तसेच सांडपाण्याचे साठे उघडे न ठेवता ते घट्ट झाकून ठेवावेत तसेच खिडक्यांना जाळ्या बसवून घ्याव्यात, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

COMMENTS