Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजी महाराजांनी बालपणापासून स्वराज्याच्या प्रवासाचे संस्कार आत्मसात केले- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - छत्रपती शिवरायांच्या पश्चात सर्व लढाया लढवून संभाजी महाराजांनी विक्रम नोंदवला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या 9 व्या वर्षा

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली अकोल्यातील दंगलग्रस्त भागाला भेट 
वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने केली चक्क  रिक्षा चालकाकडे केली पैशाची मागणी 
आमिर खानच्या लाडक्या लेकीला बॉयफ्रेंड केलं हटके प्रपोज

बीड प्रतिनिधी – छत्रपती शिवरायांच्या पश्चात सर्व लढाया लढवून संभाजी महाराजांनी विक्रम नोंदवला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या 9 व्या वर्षापासून स्वराज्याच्या प्रवासाचे संस्कार आत्मसात केले असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
मंगळवार दि.30 रोजी शहरातील राजमाता जिजाऊ उद्यानासमोर राजीव गांधी चौक येथे बुलंद छावा मराठा युवा परिषद बीडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त ह.भ.प.कल्याण महाराज काळे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर तर विलास बडगे, डॉ.योगेश क्षीरसागर, नितीन धांडे, सुभाष सपकाळ, अ‍ॅड.विनायक जाधव, नितीन बावणे, डॉ.बाळासाहेब पिंगळे, चंद्रकांत सानप, कमलताई निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, समाजात चळवळीत लोकहिताचे कामे करणारे यांना पुरस्कार दिला तर ते ओझे नसुन कौतुकाची थाप असते, इतरांनीही आदर्श घ्यावा यासाठी पुरस्कार दिले जातात.ज्यांनी इतिहासाच्या पानावर कायम नाव कोरले असे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची उंची हिमालयापेक्षाही मोठी आहे. अवघ्या 9 व्या वर्षापासून स्वराज्याच्या प्रवासाचे संस्कार त्यांनी आत्मसात केले. छत्रपती शिवरायांच्या पश्चात सर्व लढाया लढवुन संभाजी महाराजांनी विक्रम नोंदवला. तरूणांना उत्स्फुर्त आणि प्रेरणा देणारा राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बीड शहरात आवश्यक आहे. आपण यासाठी नक्कीच पुढाकार घेवु. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि स्वराज्याप्रति असणारी तळमळ हे त्यांचे गुण घेण्यासारखे आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक बुलंद छावाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल बहीर, नारायण गवते, जीवन धांडे, आदिनाथ आदमाने, शशिकांत माने, ज्ञानदेव काशिद, युवराज मस्के, गणेश मस्के, बापुसाहेब शिंदे, पंजाबराव येडे, जयदत्त थोटे, गणेश नाईकवाडे, शुभम काशिद, विनोद चव्हाण, श्रीकांत बागलाने, आर.आर.उगले, मनोज चव्हाण, भागवत मस्के,राहुल मस्के, विजय पवार, कल्याण भवर, दादासाहेब गवते, श्रीराम गवते, बाळासाहेब गवते, वैजिनाथ बनकर, कमलाकर बहिर, किशोर बनकर यांच्यासह महिला पुरूषांची उपस्थिती होती.

COMMENTS