Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या

पुणे : पुण्यातल्या वाघोलीमध्ये सोमवारी एका तरुणीने प्रियकराची चाकूने वार करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे पुण

रागात पत्नीचे तुकडे करून हत्या
पुण्यात सिंहगड रोडवर फळविक्रेत्याची हत्या
पत्नीने केली पतीची दगडाने ठेचून हत्या

पुणे : पुण्यातल्या वाघोलीमध्ये सोमवारी एका तरुणीने प्रियकराची चाकूने वार करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे पुणे जिल्हा हादरला होता. या हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. अशामध्ये अनुजाने यशवंतची हत्या करण्यामागचे धक्कादायक कारण समोर आली आहे. यशवंतच्या सततच्या त्रासाला आणि संशयखोर वृत्तीला कंटाळून संतप्त झालेल्या अनुजाने त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अनुजाला अटक केली आहे. यशवंत महेश मुंडे (वय 22) असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर अनुजा महेश पनाळे (वय 21) असे हत्या करणार्‍या प्रेयसीचे नाव आहे. हे दोघेही वाघोलीतील रायसोनी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होते.

COMMENTS