पुणे । प्रतिनिधी ः पुणे शहरातील औंध भागात एका स्वंयसेवी संस्थेच्या कार्यक्रमात आय.ए.एस अधिकारी म्हणून सहभागी झालेल्या एका तोतयाला गुन्हे शाखेच्या
पुणे । प्रतिनिधी ः पुणे शहरातील औंध भागात एका स्वंयसेवी संस्थेच्या कार्यक्रमात आय.ए.एस अधिकारी म्हणून सहभागी झालेल्या एका तोतयाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. वासुदेव निवृत्ती तायडे (वय 54) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी सिंध हौसिंग सोसायटी, औंध येथे बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये जम्मु काश्मिर येथे मदतीसाठी पाठवण्याकरीता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे वेळी विरेन शहा, सुहास कदम, पी. के. गुप्ता व इतर ट्रस्टी व सदस्य असे हजर होते. कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणुन आलेला एका व्यक्तीने आपले नाव डॉ. विनय देव असे सांगितले की, ते स्वत: आय. ए. एस. या पदावर असून सध्या त्यांची ड्युटी सेक्रेटरी या पदावर पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे असून गोपनीय काम करीत असतात. संबंधित माहितीबाबत त्यांच्याकडे संस्थेचे पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली असता त्यांच्या आयएएस पदाबाबत त्यांना संशय वाटला. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित माहितीच्या आधारे डॉ.विनय देव याचा शोध घेत त्याला तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेण्यात आले. त्यास विश्वासात घेवून अधिक चौकशी करता, त्याने आपले खरे नाव लपवून आपले नाव डॉ. विनय देव असे सांगून स्वत: आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे डेप्युटी सेक्रेटरी म्हणुन नोकरीस असल्याचे लोकांना सांगून लोकांमध्ये वावरत असल्याचे सांगितले.
COMMENTS