Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोटार वाईडींगचे दुकानातून 62 हजारांच्या साहित्याची चोरी

शिर्डी/प्रतिनिधीः राहाता शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले मोटार वाईडींग दुकानातून एका अ्यात चोरट्याने शटर उचकाटुन 62 हजार रुपयांच्या साहित्याची च

जालन्याच्या ’मत्स्योदरी’ देवीच्या मंदिरात चोरी
पनवेलमध्ये ज्वेलर्सच्या दुकानाला पाडले भगदाड !
मारुती मूर्तीचा चांदीचा डोळा मारल्याने खळबळ

शिर्डी/प्रतिनिधीः राहाता शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले मोटार वाईडींग दुकानातून एका अ्यात चोरट्याने शटर उचकाटुन 62 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केलीण  याबाबतची तक्रार आरिफ नजिर सय्यद वय 45 वर्ष  यांनी राहाता पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे .
      या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, दि 21/05/2023 रोजी रात्री 09 वाजेपासून ते दि 22/05/2023 रोजी सकाळी 07ः30 वाजेच्या दरम्यान राहाता शहरात स्टेट बँकेशेजारी असलेल्या सहा नंबर गाळ्यात शहा मोटार वाईडींगचे दुकानातून एक एचपीच्या 10 इलेक्ट्रीक मोटार दुरुस्ती साठी आलेल्या, फ्रिज कॉम्प्रेसरचे सुमारे 20 नग दुरुस्तीसाठी आलेले,बोरवेल मोटर्स सुमारे 04 नग, कॉपर वायर सुमारे 10 किलो, मोटार पितळी इंपरेल सुमारे 30,े कॉपर वायर टेअर सुमारे 05 किलो,े पानबुडी मोटार 02 नग असे एकुण सुमारे 62,000/- रुपये  किंमतीचे साहित्य हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकाणाचे शटर उचकाटुन आत प्रवेश करुन चोरुन नेल्या आहे. फिर्यादीवरुन गुन्हा रजि नं 0286/2023 भा.द.वि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS