पुणे/प्रतिनिधी ः दांडेकर पूल भागात एकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. खूनामागचे कारण समजू शकले नाही. अनिल शिवाजी मोरे (वय 5
पुणे/प्रतिनिधी ः दांडेकर पूल भागात एकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. खूनामागचे कारण समजू शकले नाही. अनिल शिवाजी मोरे (वय 51) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी दिली. दांडेकर पूल परिसरातून जनता वसाहतीकडे जाणार्या रस्त्यावर बुधवारी एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविली. खूनामागचे कारण समजू शकले नसून दत्तवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
COMMENTS