Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सन १९९६ चे वर्ल्डकप विजेते श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा यांचे ठाणे शहरात स्वागत 

  ठाणे प्रतिनिधी - सन १९९६ चे वर्ल्डकप विजेते, श्रीलंकेचे माजी कर्णधार श्री.अर्जुना रणतुंगा हे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून ओवळ

अखेर तीनशे फूट बोअरवेलमध्ये पडलेल बाळ सुखरूप … | LOK News 24
पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त ः पाशा पटेल
मुख्याध्यापकासह शिक्षक दारु पिऊन शाळेत

  ठाणे प्रतिनिधी – सन १९९६ चे वर्ल्डकप विजेते, श्रीलंकेचे माजी कर्णधार श्री.अर्जुना रणतुंगा हे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून ओवळा-माजिवडा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांची व क्रिकेटच्या मैदानांची पाहणी करण्याकरिता आज मंगळवार दि. २३ मे, २०२३ रोजी ठाणे शहरामध्ये आले. यावेळी युवासेना नेते श्री. पुर्वेश सरनाईक व मुंबई क्रिकेट लीगचे चेअरमन श्री. विहंग सरनाईक यांच्या उपस्थित लोकमान्यनगर येथील स्व.रामचंद्र ठाकुर तरण तलावाच्या ठिकाणी आमदार श्री.प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेली व्यायामशाळा व त्यामधील साहित्याचे लोकार्पणाचा कार्यक्रम श्रीलंकन माजी कर्णधार श्री. अर्जुना रणतुंगा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठूरायाची मूर्ती व शाल देऊन श्री. अर्जुना रणतुंगा यांचे स्वागत केले.

– सदर कार्यक्रमामध्ये श्री. अर्जुना रणतुंगा यांनी भाषण करताना सांगितले कि, मी ही एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो असून जर सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना सुसज्य अश्या सुविधा मिळाल्या तर  यांच्यातूनच भविष्यात गावस्कर व तेंडुलकर सारखे खेळाडू निर्माण होतील. त्याचप्रमाणे यावेळी गरीब व गरजू क्रीडापट्टूना मोफत क्रिकेट साहित्याचे वाटप श्रीलंकन माजी कर्णधार. अर्जुना रणतुंगा यांच्या हस्ते करण्यात आले.

सुसज्य असे जिम उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच श्रीलंकन माजी कर्णधार श्री.अर्जुना रणतुंगा यांची भेट झाल्याबद्दल तरुणांनी व  क्रीडापट्टूनी आमदार श्री. प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.

COMMENTS