मुंबई/प्रतिनिधी ः दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये 26/11 सारखा हल्ला करू अशी धमकी मुंबई पोलिसांना देवून 48 तास उलटत नाही तोच पुन्हा मुंबईमध्ये बॉम्बस्
मुंबई/प्रतिनिधी ः दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये 26/11 सारखा हल्ला करू अशी धमकी मुंबई पोलिसांना देवून 48 तास उलटत नाही तोच पुन्हा मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी एका व्यक्तीने चक्क ट्विटरवरून दिल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी सुरू केली असून, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड या नेत्यांनाही धमक्या आल्या होत्या.
मुंबई पोलिसांना यापूर्वी फोन, ई-मेलवरून बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्या आल्या. गेल्या दोन दिवसांपूर्वीही धमकीचा असाच फोन आला होता. मात्र, आता एका माथेफिरूने सोमवारी (22 मे) सकाळी अकराच्या सुमारास चक्क ट्विटरवरून मुंबई पोलिसांना धमकी दिली आहे. इंग्रजीत लिहिलेल्या या संदेशात म्हटले आहे की, मी मुंबईत लवकरच स्फोट घडवणार आहे. पोलिसांनी या धमकीची गांभीर्याने दखल घेत संबंधिताचा तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांना रविवारी रात्रीही (21 मे) एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. त्यात संबंधिताने मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा उल्लेख केला आणि अचानक फोन कट केला. फोन करणार्या व्यक्तीने आपण राजस्थानमधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच मुंबई हल्ल्याशी संबंधित माहिती आपल्याला दिली जात असल्याचे पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे या व्यक्तीने यापूर्वीही फोन केल्याचे समोर आले आहे.
COMMENTS