Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाण्यात बस-कंटेनरचा भीषण अपघात, ५ जण जागीच ठार

बुलढाणा प्रतिनिधी - पुण्याहून मेहकरला जाणाऱ्या एसटी बसला बुलडाण्याजवळ मंगळवारी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास भीषण अपघात झाला. समोरून आड

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला
ट्रक धडकेत निवडणूक प्रशिक्षणार्थी शिक्षक जखमी
कोंढवा परिसरातील अपघातात एकाचा मृत्यू

बुलढाणा प्रतिनिधी – पुण्याहून मेहकरला जाणाऱ्या एसटी बसला बुलडाण्याजवळ मंगळवारी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास भीषण अपघात झाला. समोरून आडवा आलेल्या कंटेनरमध्येच बस घुसली. या भीषण अपघातात बस चालकासह 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी आहेत. पळसखेड चक्का गावाजवळ अपघात झाला. अपघात झाल्याची माहिती मिळताच पळसखेडचे गावकरी मदतीला धावून आले. जखमी प्रवाशांना गावकऱ्यांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवले. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-औरंगाबाद महामार्गावर कंटेनर आणि एसटी बसची पळसखेड चक्का गावाजवळ जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पाच जण ठार झाले. मृतांमध्ये बस चालकाचा समावेश आहे. अपघातग्रस्त बस ही औरंगाबादहून मेहकरच्या दिशेने जात होती. या अपघातात 15 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. वाहतूक खोळंबली एसटी बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातानंतर मुंबई- औरंगाबाद महामार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

COMMENTS