Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पतंजलीच्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थ ?

मुंबई/प्रतिनिधी ः आयुर्वेदीक औषधांपासून उत्पादनं तयार करण्याचा दावा करणार्‍या पतंजली कंपनीच्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थाचा झाल्याचा आरोप कर

नैतिकता आणि भाजपमध्ये विरोधाभास ः शरद पवार
उन्हाळ्यात चेहऱ्याची घ्यायची काळजी
लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचे अनैतिक संबंध उघड ; थेट वरात पोलीस स्टेशनला

मुंबई/प्रतिनिधी ः आयुर्वेदीक औषधांपासून उत्पादनं तयार करण्याचा दावा करणार्‍या पतंजली कंपनीच्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थाचा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वकील शाशा जैन यांनी या प्रकरणात पतंजली कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
पतंजली कंपनीची टूथपेस्ट दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पतंजली कंपनी टूथपेस्ट दिव्या दंत मंजन हे पूर्णपणे शाकाहारी असल्याचे सांगत ग्राहकांना मांसाहाराचा समावेश असलेले उत्पादन विकत असल्याचेही तक्रारदार वकिलांकडून सांगण्यात आले आहे. पतंजलीच्या दंत कांती टूथपेस्टमध्ये कटलफिश या माशाची हाडं आणि मांस वापरण्यात आल्याचा दावा वकील शाशा जैन यांनी केला आहे. त्यांनी पतंजली कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितले आहे. त्यानंतर आता अनेकांनी पत्र शेयर करत ग्रीन लेबल लावून पतंजली मांसाहारी पदार्थ असलेले उत्पादने कशी काय विकू शकते?, असा सवाल त्यांनी केला आहे.  

COMMENTS