Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव दंगलप्रकरणी सूड भावनेतून गुन्हे दाखल

वंचित बहुजन आघाडीचा आरोप ः गुन्हे मागे घेण्याची केली मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : शेवगाव शहरात 14 मे रोजी छत्रपती संभाजी जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकी दरम्यान झालेल्या दंगली मध्ये पोलिसांनी सुड भावनेने व

पेट्रोल -डिझेल गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची एक कोटी स्वाक्षरी मोहीम सुरू
कोमल वाकळे हीचे बाबुजी आव्हाड महाविद्यालयात जल्लोषात स्वागत
राहुलदादा जगताप लढणार विधानसभा निवडणूक !

अहमदनगर/प्रतिनिधी : शेवगाव शहरात 14 मे रोजी छत्रपती संभाजी जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकी दरम्यान झालेल्या दंगली मध्ये पोलिसांनी सुड भावनेने वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, नगरसेवक कैलास तिजोरे व इतर सहकार्‍यांवर जाणीवपूर्वक दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, दक्षिण जिल्हा महासचिव योगेश साठे, लाल निशाण पक्षाचे अनंत लोखंडे यांच्या सह्या आहेत. प्रत्यक्षात गुन्हा घडला त्यावेळी म्हणजेच 14 मे रोजी प्रा. किसन चव्हाण हे सायंकाळी 6 वाजे पर्यंत तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद येथील डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात झालेल्या जयंती महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यानंतर प्रा. किसन चव्हाण हे शेवगाव पासून 25 किलोमिटर अंतरावर असलेल्या बोधेगाव येथे रात्री 9 वाजे पर्यंत एका लग्न सोहळ्यात व वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. पावणे दहाच्या सुमारास ते आपल्या शेवगाव येथील घरी पोहचले रात्री 9:54 मिनिटांनी पाथर्डीचे पोलिस निरीक्षक मुटकुळे यांचा प्रा. किसन चव्हाण यांना फोन आला. शिवाजी चौकात आपले पदाधिकारी पाठवा म्हणजे दंगल शांत करण्यास मदत होईल. असे ते म्हणाले. त्यानंतर रात्री 9:59 मिनिटांनी व 10:29 मिनिटांनी प्रा. किसन चव्हाण यांनी शेवगाव चे पोलिस निरीक्षक पुजारी यांना 2 वेळा फोन केले पण त्यांनी फोन घेतले नाहीत. त्यामुळे प्रा. किसन चव्हाण हे स्वतः रात्री 10:45 वा शेवगाव पोलीस स्टेशन ला गेले व पुजारी यांना फोन केला. पोलिस स्टेशन मधील 20ते 25 पोलिसांना शिवाजी चौकात बोलवा असे ते म्हणाले. दुसर्‍या दिवशी सकाळी 9:30 वा. पोलीस स्टेशन ला जाऊन डी. वाय. एस. पी. संदीप मिटके व पाटील यांना पाठवून दंगल खोरांवर कडक कारवाई करावी मात्र विनाकारण कुणालाही आरोपी करू नये अशी विनंती त्यांनी केली. मात्र शेवगाव चे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी मागील घटनेचा राग मनात धरून सुडाच्या भावनेतून प्रा. किसन चव्हाण व त्यांच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी व ज्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही अश्या कार्यकर्त्यांची नावे या गुन्ह्यातून वगळण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अशोक देव्हढे, प्रमोद आढाव, अनिल पाडळे, प्रवीण ओरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS