Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेततळ्यात बुडून महिलेसह दोन मुलींचा मृत्यू

मसूर / वार्ताहर : पाडळी (हेळगाव), ता. कराड येथे शेततळ्यात पडून महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये मजूर कुटुंबातील एका महिलेसह दोन मुल

केंद्र शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा ः आमदार आशुतोष काळे
BREAKING: देवेंद्र फडणवीसवर गुन्हा दाखल | LokNews24
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार

मसूर / वार्ताहर : पाडळी (हेळगाव), ता. कराड येथे शेततळ्यात पडून महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये मजूर कुटुंबातील एका महिलेसह दोन मुलींचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या महिलेस तीन लहान मुले असल्याचे समजते. घडलेल्या घटनेमुळे पाडळीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज मंगळवार, दि. 16 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
यामध्ये पोहायला येत असणार्‍यांनी बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असे समजते.त्यामध्ये सहा जणांना वाचवण्यात त्यांना यश आले. परंतू, एका महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मध्ये, शोभा नितीन घोडके (वय 35), सरस्वती रामचंद्र खडतरे (वय 11) व वैष्णवी गणेश खडतरे (वय 15) अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाडळी (हेळगाव) येथे एका शेतकर्‍याच्या शेतावर शेतमजुरी करणारे कुटुंब वास्तव्यास आहे. डोंगरालगत असलेल्या या शेतात पाण्यासाठी मोठे शेततळे बांधण्यात आले आहे. या शेततळ्यावर शेतमजुरांसह काहीजण पोहण्यासाठी जातात. याठिकाणी शेततळ्यात काहींनी पोहताना आधारासाठी दोरी बांधली होती. आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शेततळ्यावर पोहण्यासाठी सुमारे काही जण गेले होते. यावेळी ज्यांना पोहता येत नाही, असे दोरीचा आधार घेत पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यादरम्यान दोरीला जास्तजणांनी एकाच वेळी पकडल्याने दोरीवर अतिरिक्त ताण येवून दोरी तुटली. त्यामुळे दोरीचा आधार घेतलेले सर्वजण पाण्यात बुडू लागले. ही बाब शेततळ्यात पोहणार्‍या बाकी जणांच्या लक्षात येताच त्यांनी बुडणार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सहाजणांना वाचवण्यात त्यांना यश आले. परंतू, एका महिलेसह अन्य दोन मुली शेततळ्यातील पाण्यात बुडाल्या. त्यांनाही तात्काळ पाण्याबाहेर काढून उपचारासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतू, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेने पाडळी (हेळगाव) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS