पाथर्डी प्रतिनिधी - रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जंतीनिमित्त शेवगाव येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात झालेल्या दगडफ
पाथर्डी प्रतिनिधी – रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जंतीनिमित्त शेवगाव येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात झालेल्या दगडफेकीचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच त्यातील आरोपीना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाथर्डी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पाळत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चाची सुरवात नवीपेठ येथून झाली.कोरडगाव चौक,नगर रोड मार्गे पोलिस ठाण्यावर मोर्चा गेल्यानंतर मोर्चाचे रूपांतर निषेध सभेत झाले.यावेळी माणिक खेडकर,अमोल गर्जे, देविदास खेडकर, मृत्युजय गर्जे,अजय भंडारी,संतोष जिरेसाळ,सचिन नागापुरे,योगेश रासने,पप्पू पालवे, आदीं जणांनी तीव्र भावना व्यक्त करत सदरील घटनेचा निषेध नोंदवला.
यावेळी मोर्चेकराना सामोरे जात पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी म्हटले की,सध्याचा काळात सोशल माध्यमातून जाणतेपणी आणि अजानतेपणी काही स्टेट्स ठेवले जात असल्याने समाजामध्ये
द्वेष भावना निर्माण होत आहे.सोशल माध्यमात येणारे संदेश पुढे पाठवताना किंवा आपल्या मोबाईलच्या स्टेट्सला ठेवताना त्याची सत्यात पडताळून घेत कोणाच्या भावना दुखवणार नाही याची काळजी घ्यावी.समाजात शांतता राहिली तर समाजाचा विकास होईल.असे मत व्यक्त केले.
COMMENTS