Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड बस स्थानकाच्या कामाला सुरुवात कधी होणार!

उद्घाटन समारंभ उरकणार्‍या पुढार्‍यांनो बीड बस स्थानक विसरले का?

बीड प्रतिनिधी - माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह माजी आमदार व विद्यमान आमदारांनी उद्घाटन केलेल्या बीड बस स्थानकाचे काम कधी पूर्ण होणार,सात

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
चंद्राचा तुमच्या आरोग्यावर खरोखर परिणाम होतो का ?
आंध्रातील स्फोटात 18 जणांचा मृत्यू

बीड प्रतिनिधी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह माजी आमदार व विद्यमान आमदारांनी उद्घाटन केलेल्या बीड बस स्थानकाचे काम कधी पूर्ण होणार,सात वर्षापासून बीड बस स्थानकाची दुर्दशा झाली असून मुख्य बस स्थानकात खड्डे व दगड गोटे सर्वत्र पहावयास मिळतात. मराठवाड्यातील मुख्य बस स्थानक असणार्‍या बीड बस स्थानकाची बकाल अवस्था असून फक्त उद्घाटन समारंभ उरकणार्‍या पुढार्‍यांनो बीड बस स्थानक विसरले का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
सात वर्षांपूर्वी बीड बस स्थानक नूतन इमारतीचे उद्घाटन माजी  मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले होते. भव्य दिव्य इमारत होणार बीड बस स्थानकाचा कायापालट होणार अशा मोठे आश्वासन देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र सात वर्षे पूर्ण झाली तरीही इमारतीचे एक नवीन विट लावण्यात आलेली नाही, बस स्थानकात सर्वत्र मोठे खड्डे व दगड गोटे पसरले आहेत अनेक वेळा बस येत असताना दगड उडून प्रवासी जखमी होण्याची घटनाही घडली आहे. नूतन इमारत नसल्यामुळे अनेक जुन्या बस स्थानकात गैरसोयी वाढल्या आहेत. पिण्याचे पाणी. सर्वत्र खड्डे असल्याने प्रवाशांची होणारी तारांबळ, अशा अनेक अडचणी नूतन इमारत नसल्याने उत्पन्न झाले आहेत याकडे बस स्थानक प्रशासनाचे दुर्लक्ष तर आहेत ाशिवाय पुढार्यांनी उद्घाटन केले मात्र बस स्थानक वार्‍यावर सोडले असाच प्रकार सुरू आहे, एक नवे तीन ते चार वेळा या नूतन बस स्थानकाचे उद्घाटन झाले परंतु प्रत्यक्षात मात्र कामाची सुरुवात संत गतीने सुरू आहे यामुळे जुन्या बस स्थानकात सर्वत्र घाणच घाण दिसते. मराठवाड्यातील मुख्य केंद्रबिंदू तसेच कर्नाटक आंध्र सौराष्ट्र गुजरात या राज्यांना येथून बस सेवा पुरवली जाते इतर राज्यातील बस या ठिकाणी येतात मात्र बस स्थानक तेही बस पार्किंग करण्याची अडचण निर्माण होते. बीड बस स्थानकाकडे सर्वांनी दुर्लक्ष केल्याने सात वर्षाचा कालावधी लोटूनही बस स्थानकाचे काम फक्त पाया खोदणे पुरतेच सीमित झाले आहे, बीड बस स्थानकाची नूतन इमारत कधी पूर्ण होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासकीय स्तरावर काय अडचण आहे? इमारत बांधकामाचे बजेट दिले असताना काम संत गतीने का?अशा अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून बीड बस स्थानकाची नूतन इमारत कधी होणार? असा संतप्त सवाल प्रवासी व  नागरिकांमधून विचारला जात आहे.
स्थानकात अस्वच्छता चे चित्र!
नूतन इमारतीचे बांधकाम सुरू आहे मात्र संत गती असल्याने येत्या पाच वर्षातही हे बांधकाम पूर्ण होईल का? याची शाश्वती देता येत नाही, जुन्या बस स्थानकात वयोवृद्ध, यांना बसण्यात जागा नसल्याने समोर इतर कुठेही बसून आपल्या गाडीची वाट पाहण्यापलीकडे त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध नाही विशेष म्हणजे समोर आजूबाजूला कचर्‍याचे डिगारे , घाणीचे साम्राज्य पसरले आहेत, मात्र वय वृद्धांना व प्रवाशांना येथेच बसावे लागते, प्रवाशांचा विचार करून प्रशासनाने व राजकीय पुढार्‍यांनी तात्काळ काम पूर्णत्वाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

COMMENTS