Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.लक्ष्मण पवार मंत्री पदाचे दावेदार-रामेश्वर मस्के

गेवराई प्रतिनिधी- राज्यातील बहुतांश आमदार परराज्यात गेल्यावर विकास कामाला अपयशी ठरलेले  आघाडी सरकार बरखास्त झाल्यानंतर महाराष्ट्रात ना. एकनाथ शिं

वडार समाजाचा प्रश्‍न सोमवारी विधिमंडळात मांडणार : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
काळा बाजार करणार्‍यांच्या नातेवाइकांकडून घेतलेली पार्टी अंगलट
अवकाळीच्या कळा…

गेवराई प्रतिनिधी- राज्यातील बहुतांश आमदार परराज्यात गेल्यावर विकास कामाला अपयशी ठरलेले  आघाडी सरकार बरखास्त झाल्यानंतर महाराष्ट्रात ना. एकनाथ शिंदे यांचा एक सक्षम गट व भारतीय जनता पार्टी मिळुन स्थापन झालेल्या सरकारमध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार अ‍ॅड. लक्ष्मण आण्णा पवार यांना कॅबिनेट मंत्रीपद व बिड जिल्ह्याचे पालकमंत्री पदावर विराजमान करावे अशी सर्व सामान्य बिड जिल्ह्यातील जनतेची मागणी आहे. तरी येणार्‍या काळात मंत्री मंडळ विस्तार मध्ये त्यांच्या व तमाम जनतेच्या  भावनेचा मन:पुर्वक  आदर करून आमदार पवार यांना जिल्ह्याच्या विकासासाठी संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपरिषद, गेवराई पंचायत समिती, तिन जिल्हा परिषद गट, सलग दुसर्‍यांदा आमदार अशी एक हाती सत्ता असणारे मराठवाड्यातील प्रामाणिक, लोकप्रिय, विकासाचे कार्यसम्राट आमदार अ‍ॅड. लक्ष्मण आण्णा पवार साहेबांना मंत्री मंडळात संधी देवुन पालकमंत्री पदावर विराजमान करावे सध्या बिड जिल्ह्यातील जनतेच्या चर्चेतून एकमेव आमदार पवार यांचे नांव आघाडीवर आहे त्यामुळे आमदार पवार यांना मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी गोदाकाठची बुलंद तोफ – रामेश्वर मस्के भोगलगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

COMMENTS