Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाच स्वीकारणार्‍या सहाय्यक पोलीस निरीक्षका विरुद्ध गुन्हा

नाशिक प्रतिनिधी - अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या कामी मोबदल्यापोटी 30 हजार रुपयांची लाच मागणार्‍या अहमदनगरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध गु

बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी
पुण्यातील वाहतूक कोंडीवर दोन नव्या उड्डाण पुलाचा उतारा
अशोक चव्हाण-अजित पवारांमध्ये ’गुफ्तगू’

नाशिक प्रतिनिधी – अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या कामी मोबदल्यापोटी 30 हजार रुपयांची लाच मागणार्‍या अहमदनगरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित विवेक अशोक पवार (वय 35) हे अहमदनगर येथे कोतवाली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहतात. यातील तक्रारदार यांचा मावसभाऊ व त्याच्याबरोबर असलेले चार सहआरोपी यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक न करता अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती 25 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन व नितीन नेटारे यांच्या पथकाने सापळा रचून संशयित सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांच्याविरुद्ध कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

COMMENTS