Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव दगडफेक प्रकरणी 60 जण ताब्यात

दीडशे समाजकंटकावर गुन्हे दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये रविवारी (ता. 14) रात्री दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यात पोलिस कर्मचार्‍यांसह 4 जण गंभीर

ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साईबाबा विश्वस्त संस्थानने माणुसकीची शिकवण जपली : मुख्यमंत्री
LOK News 24 । छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना
Ahmednagar : मनसेच्या वतीने शासकीय परिपत्रकाची होळी l Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये रविवारी (ता. 14) रात्री दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यात पोलिस कर्मचार्‍यांसह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारपर्यंत 60 जणांना ताब्यात घेतले आहे. तर, 150 समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दगडफेकीमध्ये दुकाने, वाहन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दगडफेकी वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज केला, यात चार पोलीस कर्मचारी सुध्दा जखमी झाले आहेत. या दरम्यान शेवगाव पोलीस पुढील तपास करत असून सीसीटीव्हीच्या आधारे समाजकंटकाचा शोध घेतला जात आहे. मिरवणूक रात्री आठच्या दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली तेव्हा मिरवणुकीच्या दिशेने अचानक दगडफेक सुरू झाली असे मिरवणुकीत सहभागी असलेल्या गटाचे म्हणणे आहे. तर, आमच्या धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक झाली असे दुसर्‍या गटाचे म्हणणे आहे. सुरवातीला दगडफेक झाल्याची अफवा पसरली आणि या अफवेमुळे प्रत्यक्षात दगडफेक झाल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.  

शेवगाव शहरात कडकडीत बंद – दगडफेक सुरू असतानाच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यादरम्यान 4 पोलिस कर्मचारी जखमी झाले. तसेच, दोन युवकही गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर सोमवारी शेवगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बंदमुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाल्याने ग्रामीण भागातून खरेदीसाठी शेवगावात आलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

COMMENTS