Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईसाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांचे रक्तदान युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- रुग्णांच्या आयुष्यासाठी रक्त ही जीवनावश्यक बाब बनली आहे. रक्त कृत्रिमरित्या तयार होत नसल्याने मनुष्याला रक्तासाठी मनुष्यावरच

डॉ.उपाध्ये यांची कथा विद्यार्थ्यांना जागृत करणारी ः  द.सा. रसाळ
आमदार आशुतोष काळे यांचा व्यापारी संघाकडून नागरी सत्कार
धक्कादायक: कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तरुणाने आयुष्य संपवलं | ‘१२च्या १२बातम्या’ | LokNews24

अहमदनगर (प्रतिनिधी)– रुग्णांच्या आयुष्यासाठी रक्त ही जीवनावश्यक बाब बनली आहे. रक्त कृत्रिमरित्या तयार होत नसल्याने मनुष्याला रक्तासाठी मनुष्यावरच अवलंबून रहावे लागते. रक्तदाता हा एखाद्याचा जीवदाता ठरत असतो. माणुसकीच्या भावनेने प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहन मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी केले. तर युवकांची एकत्र येऊन राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
आईसाहेब प्रतिष्ठानच्या वतीने नालेगाव येथील शिव पवन मंगल कार्यालयात ओंकार काळे यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक अजय चितळे, लक्ष्मीबाई लोंढे, नगरसेविका सोनाली चितळे, छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे, मेजर तुकाराम डफळ, शिवाजी पालवे, अमोल गर्जे, शिवाजी वेताळ, केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर, कैलास येवले, दिनेश लोढा, छावा संघटना पश्‍चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष दत्ता वामन, योगेश खेंडके, शिवराष्ट्र सेनेचे संतोष नवसुपे, अनिल शेकटकर, सुभाष लोढा, चंद्रलेखा लोढा, वांजोळीचे सरपंच आप्पासाहेब खंडागळे, सोसायटीचे चेअरमन बद्रीनाथ खंडागळे, महेश काळे, राम कराळे, आनंदऋषी रक्तपेढीचे डॉ. शंकर मोरे, विशाल चव्हाण, सुमित लोढा, अजय लच्छाणी, श्री काळे, दिपक निशाद, अथर्व गायकवाड, सुश्मीत रहाने, निरज चोरबोले, सर्वेश डिक्कर, चैतन्य लोढा, स्वप्निल गुंदेचा, संकेत कुर्‍हे, साहील सोनसळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात ओंकार काळे म्हणाले की, आईसाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व युवक एकत्र येऊन सामाजिक योगदान देत आहे. कायमच रक्ताची एकमेकांना गरज भासत असते. रक्तदानाने एखाद्याचे जीव वाचविण्यासाठी सर्व युवकांनी रक्तदान केल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब काळे यांनी केले. नगरसेविका सोनाली चितळे यांनी युवकांनी सामाजिक भावनेने रक्तदानासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.
दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. रक्तदान शिबिराला श्री आनंदऋषीजी रक्तपेढीचे सहकार्य लाभले. रक्तदान यशस्वी करण्यासाठी रक्तपेढीचे डॉ. मोरे, सुनिल महानोर, निशात शेख, विशाल जाधव, ज्योती नरसाळे, तन्वी जाधव, संदीप पानसरे आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS