सांगली प्रतिनिधी- लावणी फेम गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून २ दिवसांची सुट्टी द्या, असा मजकुराचा एक रजेचा अर्ज एसटी चालकाने केला आणि हा अर्ज

सांगली प्रतिनिधी- लावणी फेम गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून २ दिवसांची सुट्टी द्या, असा मजकुराचा एक रजेचा अर्ज एसटी चालकाने केला आणि हा अर्ज सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला. तासगाव एसटी आगारातील एसटी चालकाच्या नावे संबंधित अर्ज आहे. मात्र या सर्व प्रकाराची सत्यता पडताळून पाहिली असता भलताच प्रकार समोर आला आहे.
गौतमी पाटलाच्या लावणीची अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ आहे. ‘जिथे गौतमी पाटलाचा शो, तिथे शो हाऊसफुल’असंच समीकरण गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतंय. गौतमी पाटीलचा शो पाहण्यासाठी कोण काय करेल, याचा आता नेम राहिला नाही. कारण गौतमी पाटीलचे चाहते तिची एक अदा पाहण्यासाठी तरसत आहेत. तिच्या एका फॅनने गौतमी पाटील गावात येणार असल्याने थेट सुट्टीसाठी अर्ज केला. तिला पाहण्यासाठी दोन दिवसांची रजा मिळावी, असा मजकूर एसटीच्या रजा अर्जावर लिहिला आहे. सदर चालक सांगलीच्या तासगाव आगारातील एसटी चालक असल्याचे या रजा अर्जावरून समोर येत आहे. २२ आणि २३ मे रोजी दरम्यान गौतमी पाटील येणार असल्याची तारीख अर्जावर आहे. सदर अर्ज सोशल मीडियावर तुफान वायरल झाला. नेटकऱ्यांमध्ये या अर्जावरून चांगलीच चर्चा सुरू आहे.
COMMENTS