Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समताचे कामकाज राष्ट्रीयकृत बँकापेक्षाही सरस ः काका कोयटे

क्यु.आर.कोडद्वारा इनकमिंग व आउट गोइंग व्यवहारात समता राज्यात अव्वल

कोपरगाव प्रतिनिधी ः समता पतसंस्थेचे कामकाज गेली अनेक वर्ष अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीद्वारे सुरू आहे. मोबाईल बँकिंग, व्हावचरलेस बँकिंग, पे

जवळा ग्राम सचिवालयासाठी 25 लाखाचा निधी मंजूर
प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात अनेकांना नोकरी
पाणी 20 रुपये लिटर तर, दुधाला 26 रुपये का ? ः डॉ. अजित नवले

कोपरगाव प्रतिनिधी ः समता पतसंस्थेचे कामकाज गेली अनेक वर्ष अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीद्वारे सुरू आहे. मोबाईल बँकिंग, व्हावचरलेस बँकिंग, पेपरलेस बँकिंग, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, कॉल सेंटर या प्रणालीमुळे समता बँकिंग क्षेत्रात अग्रेसर आहे. त्या तंत्रज्ञानातील यु.पी.आय. प्रणालीच्या माध्यमातून क्यु.आर कोड द्वारा ही सेवा आधी इनकमिंग पद्धतीने सुरू होती. समताचा 38 वा वर्धापनदिन व जागतिक तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आता ही सेवा आउट गोइंग केल्यामुळे देखील समताचा क्यु.आर.कोड वापरणार्‍या ग्राहकांना बँकेपेक्षा अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांपेक्षाही समताचे कामकाज सरस होणार असून ग्राहक, सभासदांना क्यु. कोडद्वारा कोणतेही शुल्क न आकारता इनकमिंग बरोबर आउट गोइंग सेवा देखील मिळणार असल्याचे समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.
   समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या 38 व्या वर्धापन दिनी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत सेल्फ बँकिंग प्रणालीचा शुभारंभ प्रमुख पाहुणे  विजय नायडू आणि क्यु.आर. कोड आउट गोइंग सेवेचा शुभारंभ प्रमुख पाहुणे विजय नायडू, सभासद डॉ.नरेंद्र भट्टड, शाम जंगम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी नेटविन सॉफ्टवेअर प्रा.लि.चे संचालक उत्तम घाडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी  अजित मेनन, मार्केटिंग अधिकारी मसूद अत्तार, आणि आय.सी.आय.सी.आय. बँकेचे रिजनल हेड शरद ढगे,  जो जोसेफ, जेष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल, अरविंद पटेल, जितूभाई शहा, चांगदेव शिरोडे, कांतीलाल जोशी,  कचरू मोकळ, संदीप कोयटे, संचालिका  शोभा अशोक दरक, तसेच संस्थेचे ग्राहक, सभासद, मुख्य कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी कोयटे ते पुढे म्हणाले की, यु.पी.आय प्रणालीच्या माध्यमातून क्यु.आर कोड द्वारा राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात चालत आहे. दरवर्षी 7400 कोटी ट्रांझक्शनच्या माध्यमातून भारतात दरवर्षी 149 लाख कोटी रुपयांचे व्यवहार हे यु.पी.आय प्रणालीच्या माध्यमातून होत असतात, म्हणजे भारतात दररोज 26 कोटी ट्रांझक्शन यु.पी.आय प्रणाली मार्फत होतात. या प्रणालीशी परिपूर्ण पद्धतीने म्हणजे इनकमिंग व आउट गोइंग पद्धतीने जोडली जाणारी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील समता पतसंस्था ओळखली जाणार आहे. ही प्रणाली नेटविन सॉफ्टवेअर प्रा.लि. आणि आय.सी.आय.सी.आय बँक द्वारे स्कॅन अँड पे क्यु.आर.कोड इनकमिंग आणि आउट गोइंग या दोन्ही पद्धतीने सुरू केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना संस्थेचे संचालक संदीप कोयटे म्हणाले की, भारतातील बँकिंग व्यवहारात 40 टक्के लोक या प्रणालीचा वापर करतात. परंतु अद्याप 60 टक्के लोक या प्रणालीशी जोडले गेलेले नाही. 2016 साली या प्रणालीची ट्रांझक्शन संख्या केवळ 93 हजार होती. हा वाढीचा वेग पाहता पुढील 2 वर्षात दररोज किमान 100  कोटी ट्रांझक्शन यु.पी.आय द्वारे होतील असा अंदाज आहे. या प्रसंगी संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड म्हणाले की, समताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामकाजाचे अवलोकन करण्यासाठी राज्यातून अनेक पतसंस्था भेट देत असतात. राज्यातील पतसंस्था चळवळ वाढावी. यासाठी समताला भेट देण्यासाठी आलेल्या पतसंस्थांना आम्ही मार्गदर्शन ही करीत असतो. संस्थेचा आय.टी.विभाग आणि नेटविन सॉफ्टवेअर प्रा.लि. यांनी वर्षभर या योजनेवर संशोधन करून ही परिपूर्ण योजना प्रत्यक्षात आणली आहे. यामुळे पतसंस्था चळवळ ही सुदृढ आणि सक्षम होणार आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख उपस्थितांचे स्वागत संचालक  अरविंद पटेल यांनी, सुत्रसंचालन  संजय पारखे यांनी तर उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी मानले.

समता प्रथम क्रमांकाची पतसंस्था – समता पतसंस्था ग्राहक, सभासदांना यु.पी.आय.प्रणाली मार्फत क्यु.आर.कोड द्वारा इनकमिंग आणि आउट गोइंगचे तंत्रज्ञान वापरात आणणारी देशातील पहिली पतसंस्था आहे. एवढेच नव्हे, तर देशातल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या सहकारी बँका सोडल्या, तर ही प्रणाली वापरात आणणारी समता पतसंस्था ही प्रथम क्रमांकाची पतसंस्था ठरली आहे.

COMMENTS