Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साई रिसॉर्ट प्रकरणी ‘ईडी’कडून आरोपपत्र दाखल

आरोपपत्रात अनिल परब यांच्या नावाचा समावेश नाही

मुंबई : कोकणातील दापोली इथल्या साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. दापोलीतील

उल्हासनगरमध्ये अज्ञात इसमांकडून वाहनांची तोडफोड | LOKNews24
अध्यक्ष-कार्याध्यक्षांचा मनमानी कारभार; इस्लामपूर युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामे देणार?
श्रीगोंदा शिवसेना युवासेनेची कार्यकारिणी जाहीर

मुंबई : कोकणातील दापोली इथल्या साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे व रिसॉर्सटचे मालक सदानंद कदम यांच्यासह सहा आरोपींविरोधात ईडीने विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात माजी मंत्री परब यांचे नाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशपांडे व कदम यांना ईडीने अटक केली आहे.
याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले असून त्यात देशपांडे व कदम यांची नावे आहे. त्यांच्याशिवाय सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश आहे. याप्रकरणी आरोप झालेले माजी मंत्री अनिल परब यांचे नाव या आरोपपत्रात नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कोणत्याही प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची तरतूद असते, असेही या अधिकार्‍याने या वेळी स्पष्ट केले. भाजप नेते किरीट सोमय्या हे दापोलीतील साई रिसॉर्टवरून अनिल परब यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉर्टच्या खरेदी-विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलेला होता. तसेच अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी, जुलै 2018 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये या रिसॉर्टचा उल्लेख केला होता. त्यासाठी वीजजोडणी अर्जही त्यांनी केला होता. तसेच, या रिसॉर्टसाठी घरपट्टीही भरण्यात आली होती, असा दावा सोमय्यां यांनी केला होता. याप्रकरणी ईडी तपास करत आहे. मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असे अनिल परब यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.

COMMENTS