Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षित घटकांना समान हक्क अधिकार मिळवून दिले:पप्पू कागदे

बीड प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील उपेक्षित, शोषित, पीडित घटकातील समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय स

भारताचा जीडीपी 6.5 टक्के राहण्याचा अंदाज
विमान आकाशात झेपावताच विमानातून निघाल्या ठिणग्या
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे पॅचिगकाम चालू

बीड प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील उपेक्षित, शोषित, पीडित घटकातील समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांना समान हक्क व अधिकार मिळवून दिले. असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे  बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केले. बीड जिल्ह्यातील वडवणी, विडा, खंडाळा, रवळसगाव, वाकनाथपुर,म्हाळस जवळा, दहिफळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जय भीम महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना पप्पू कागदे बोलत होते. यावेळी किसन तांगडे,महादेव उजगरे, गोवर्धन वाघमारे, बापू पवार, सुभाष तांगडे, नागेश शिंदे, राजाभाऊ वक्ते, सतीश सिंगारे, भाऊसाहेब दळवी, आप्पा पवार, आप्पा जाधव, अजित सावंत, नामदेव वाघमारे, सत्यभान जाधव, श्रीरंग वाघमारे, बापू गोरे, गोरक्षनाथ गोरे आदी उपस्थित होते. उपस्थित समाज बांधवांना संबोधित करताना पप्पू कागदे म्हणाले की, उपेक्षित घटकांना व समूहातील समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण सक्तीचे व मोफत सुरू केले. मनुस्मृतीच्या जोखडातून महिलांना मुक्त करण्यासाठी विविध कायदे केले,  शिक्षणाचा अधिकार दिला, शेतीसाठी व शेतकर्‍यांसाठी नदीजोड प्रकल्पाची उभारणी केली, शिक्षणात व नोकर्‍यांमध्ये आरक्षण लागू केले, एक व्यक्ती एक मत ही संकल्पना मांडून मताचा अधिकार दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील उपेक्षित समाज बांधवांना समान हक्क अधिकार व आरक्षण मिळवून दिल्यामुळेच समाज बांधव विविध क्षेत्रात आघाडीवर काम करत आहे.  असे मत पप्पू कागदे यांनी व्यक्त केले. यावेळी रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

COMMENTS