Homeताज्या बातम्यादेश

बजरंग दलाचा काँग्रेस विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा

नवी दिल्ली : ‘बजरंग दला’ची ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) शी तुलना करून बजरंग दलावर बंदीची मागणी कर्नाटक काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरन

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन
नव्याने झालेल्या टोलनाक्याचे संपूर्ण छत कोसळले
नाशिकमध्ये तीन एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली : ‘बजरंग दला’ची ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) शी तुलना करून बजरंग दलावर बंदीची मागणी कर्नाटक काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यात केली आहे. बजरंग दलाची बदनामी केली म्हणून बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषदेच्या चंदीगड प्रभागाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कायदेशीर नोटीस पाठवून काँग्रेस पक्षाच्या विरोधात 100 कोटी 10 लाख रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे, अशी माहिती ‘विश्‍व हिंदु परिषदे’चे राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बंसल यांनी दिली.
बंसल पुढे म्हणाले की, आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी हिंदूंना कलंकित करण्याचा प्रयत्न काँग्रेस सातत्याने करत आली आहे. बजरंग दलाचे राष्ट्रकार्य अविरतपणे सुरूच आहे. कोरोनाच्या काळात, तसेच विविध नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बजरंग दलाने सेवा कार्य केले आहे. बजरंग दलावर दोषारोपण करून जिहादी संघटना पी.एफ्.आय.ला वाचवायचा जर काँग्रेस प्रयत्न करत असेल, तर ते कधीच सफल होणार नाहीत. भारताची जनता आणि बजरंगबलीचे भक्त काँग्रेसला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.

COMMENTS