Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अलहुदा उर्दू हायस्कूल बीडचा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा घवघवित निकाल

शाळेतून आठ विद्यार्थी झाले पात्र

बीड प्रतिनिधी - शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरातील नूर एज्युकेशन

बळी राजाला सुखावणारा कोणताही निर्णय हे सरकार घेत नाही आहे- आ. अमोल मिटकरी 
स्वामीनाथन आयोग लागू करावा : नाना पाटेकर
ड्रोनद्वारे औषधे घरपोच होणार

बीड प्रतिनिधी – शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरातील नूर एज्युकेशनल ऍण्ड वेलफेअर सोसायटी संचालित अलहुदा उर्दू हायस्कूल बीडचे एकुण आठ विद्यार्थी पात्र झाले असुन शाळेने शिष्वृत्ती परीक्षेतील आपली उज्ज्वल परंपरा राखली आहे.
शहरातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था अलहुदा उर्दू हाईस्कूल बीड मध्ये इतर शिष्यवृत्ती आणि विवीध स्पर्धा परीक्षांसोबत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते, परिणामी अनेक विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरत आहेत.  या वर्षी  आठवी वर्गाचे विद्यार्थी कु.पीरजादे तहुरा शोएब (192 गुण) , सय्यद आफिया अनम (162 गुण), खान मासिरा रफीक (160 गुण) , सय्यद उमर फारूक नदीम (148 गुण), खान सारीना इफ्फत (146 गुण) , काझी नोमान शाहेद (136 गुण), दरकशां फातेमा (134 गुण), काझी बारेका सदफ (130 गुण) शिष्वृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत. या प्रशंसनीय कामगिरीबद्दल नूर एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष सय्यद शफीक अहमद हाश्मी, सचिव उबेदुल्ला खान, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक डॉ. सिराज खान आरजू, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS