Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गारपीटीमुळे उध्वस्त झालेल्या फळबाग मालकांना मदत करा-अमरसिंह पंडित

अमरसिंह पंडित यांनी नुकसानग्रस्तांना वावरात जावून दिला धिर

गेवराई प्रतिनिधी - तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वारे आणि अवकाळी पावसासह गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रेशीम शेतीसह

धारावीत लागलेल्या आगीत सहा जण होरपळले
जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढणार : अजित पवारांची टीका
मिल्लीया महाविद्यालयात अंगदान जागृती कार्यक्रम संपन्न

गेवराई प्रतिनिधी – तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वारे आणि अवकाळी पावसासह गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रेशीम शेतीसह अंबा, पपई, लिंबूनी, मोसंबी या फळपिकांसह उन्हाळी बाजरीच्या पिकाला गारपीटीमुळे मोठा फटका बसला आहे. माजी आ.अमरसिंह पंडित यांनी तळणेचीवाडी, भाटआंतरवाली, बोरीपिंपळगाव, उमापूरसह आदी गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देवून नुकसानीची पाहणी केली. बांधावर नव्हे तर वावरात जावून त्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धिर दिला. कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांच्याशी त्यांनी दुरध्वनीवरून संपर्क करत गारपीटीमुळे उध्वस्त झालेल्या फळबाग मालकांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
मागील दोन दिवसांत गेवराई तालुक्यातील उमापूर, बोरीपिंपळगाव, भाटआंतरवाली, तळणेचीवाडी, खळेगाव, राहेरी, आंतरवालीसह इतर अनेक गावांमध्ये वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी नुकसान शेतीला भेट देत शेतकर्‍यांना धिर दिला. बोरीपिंपळगाव येथील  अशोक पठाडे यांच्या शेतातील चार एकर पपईची बाग अक्षरशः उन्मळून पडली. तळणेचीवाडी येथील शेतकरी फुलचंद बोरकर, सचिन धस, भागवत साखरे, अविनाश धस, भानुदास धस, अनिरुद्र शिंगाडे, धर्मा शिंगाडे, विकास बोरकर, बापू एडके, सुदाम एडके, शंकर ठोंबरे, विठ्ठल काटकर यांच्यासह आदी शेतकर्‍यांच्या पपईच्या बागाचे मोठे नुकसान झाले आहे. अमरसिंह पंडित यांनी पपई बागेची पाहणी करून संबंधित शेतकर्‍यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.उमापूर येथील शेख मसुद, महेमुद पठाण यांच्या लिंबोणीच्या बागेलाही अमरसिंह पंडित यांनी भेट दिली. लिंबोणीचे झाडे वादळी वार्‍यामुळे मुळासकट उपटून पडल्याचे चित्र याठिकाणी दिसत होते. पपईसारख्या फळपिकांना शासनाच्या पिका विमा योजनेत संरक्षण मिळत नसल्यामुळे विशेष बाब म्हणून एकरी पन्नास हजार रुपयांची तातडीची मदत या शेतकर्‍यांना मिळाली पाहिजे अशी मागणी अमरसिंह पंडित यांनी केली. कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांच्याशी त्यांनी दुरध्वनीवरून सविस्तर चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या. यावेळी उपस्थित कृषी अधिकारी व इतर शासनाच्या अधिकार्‍यांना लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करण्याचे त्यांनी आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभी असून नुकसानग्रस्तांना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS