Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांसमोर कपडे फाटेपर्यंत मारहाण

पुणे प्रतिनिधी - पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रस्त्यावर चूकीच्या ठिकाणी वाहने उभी केल्यास टोइंग कर्मचारी ती वाहने घेऊन जातात. अशात

गुजरात मॉडेल बुडालं; पावसाचा धक्कादायक Video
दोन वर्षांपूर्वीच्या किरकोळ वादातुन एकाचा मृत्यू;पाथर्डी तालुक्यातील घटना
अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस ; जागा वाटपाचा घोळ कायम

पुणे प्रतिनिधी – पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रस्त्यावर चूकीच्या ठिकाणी वाहने उभी केल्यास टोइंग कर्मचारी ती वाहने घेऊन जातात. अशात पुण्यात काही टोइंग कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला वाहन हटवण्यावरून मारहाण केल्याची घटना घडली आहे.दुचाकी मालक आणि टोइंग व्हॅनमधील कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. रस्त्याच्या कडेला असेली गाडी उचलण्यावरून हा वाद झाला आहे. टोइंग कर्मचाऱ्यांनी यामध्ये दुकान मालकाला शिवीगाळ आणि मारहाण केलीये. या प्रकरणी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित व्यक्तीने केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमधील महादेवनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. रमेश बराई असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेश यांचे या परिसरात फुटवेअरचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर दुचाकी खालीपडून पेट्रोल गळत होते. ती उभी करत असताना टोइंग व्हॅन अन् पोलिस कर्मचारी महिलेसह गाडी उचलणारे तरुण खाली उतरले.त्या वेळी एकाने दुकानदार रमेश बराई यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. तसेच त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने त्यांनी बराई यांना देखील राग अनावर झाला आणि त्यांनी थेट हातात एक वीट घेऊन कर्मचाऱ्यांच्या दिशेने धाव घेतली.महिला पोलिस कर्मचारी समोर मारहाण सदर घटना घडली तेव्हा एक महिला पोलिस कर्मचारी देखील तेथे उपस्थित होत्या. त्यांच्या समोर बराई वीट घेऊन धावून आले. त्यामुळे तरुण कर्मचारी मुलांनी बराई यांना भरपूर मारहाण केली. बराई यांचे कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

COMMENTS