Homeताज्या बातम्याशहरं

ए. आर रहमान यांचा कार्यक्रम पुणे पोलिसांनी केला बंद

पुणे प्रतिनिधी - प्रसिद्ध संगीतकार ए. आर रहमान चे कॉन्सर्ट पुणे पोलिसांनी बंद पाडले आहे. ए आर रहमान गात असतानाच पुणे पोलिसांनी स्टेजवर एन्ट्र

तापमानवाढीचे संकट पेलतांना …
फलटणमधून विमानसेवा सुरू करणार : खा. रणजितसिंह नाईक
रासपची उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणार : दत्तात्रय शिंदे

पुणे प्रतिनिधी – प्रसिद्ध संगीतकार ए. आर रहमान चे कॉन्सर्ट पुणे पोलिसांनी बंद पाडले आहे. ए आर रहमान गात असतानाच पुणे पोलिसांनी स्टेजवर एन्ट्री मारली आणि हा शो बंद पाडला. 10 वाजल्यानंतरही हा शो सुरु असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याचा व्हिडिओ सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यामध्ये रविवारी प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचे कॉन्सर्ट पार पडले. या कॉन्सर्टला पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या शोमध्ये ए. आर रहमान यांनी वेगवेगळी गाणी गात पुणेकरांचे चांगलेच मनोरंजन केले. पण हा शो सुरु असतानाच पुणे पोलिसांनी तो बंद पाडला. ए आर रहमान गात असताना पुणे पोलिसांनी स्टेजवर एन्ट्री केली आणि शो बंद पाडला. 10 वाजल्यानंतरही ए. आर रहमान यांचा शो सुरु होता त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.

दहा वाजल्यानंतरही शो सुरु असल्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन ए. आर रहमान यांना गाणं थांबवण्यास भाग पाडले. इतकच नाही तर ’10 वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता’, असे म्हणत ए आर रहमान यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी तोंडावरच सुनावले. पुण्यातील राजाबहादुर मिल परिसरात रविवारी रात्री या शोचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.

COMMENTS