Homeताज्या बातम्याक्रीडा

गौतम गंभीर आणि विराट कोहली मैदानातच भिडले

इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिके

टीम इंडियाला आशिया कपमधील सुपर फोरमधील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
विराट-अनुष्का अलिबागमध्ये बांधणार आलिशान फार्महाऊस
फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहली भारतात परतला

इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सामना झाला. हा सामना बेंगलोरने १८ धावांनी जिंकला. पण या सामन्यादरम्यान आणि नंतर विराट कोहली आणि लखनऊचे खेळाडू आणि मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वाद चर्चेचा विषय ठरला.

झाले असे की बेंगलोरने लखनऊसमोर १२७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करत असताना ७७ धावांवरच लखनऊने ८ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर लखनऊकडून नवीन उल-हक आणि अमित मिश्रा फलंदाजी करत होते. त्याचदरम्यान बेंगलोरचा स्टार खेळाडू विराट तिथे क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्या शाब्दिक वाद झाले.

यावेळी पंचांनी मध्यस्थी करत मिश्रा, नवीन आणि विराट यांच्यातील वाद सोडवले होते. पण नंतर सामना संपल्यानंतर दोन्ही संघ हात मिळवत असताना विराट आणि नवीन समोर आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यांच्यातील वाद इतके वाढले की दोन्ही संघातील इतर खेळाडूंना त्यांना दूर करावे लागले.

याचदरम्यान लखनऊचा सलामीवीर काईल मेयर्सही विराटशी काहीतरी बोलला होता आणि त्यावेळी गंभीरही चिडलेला दिसला होता. काही क्षणात हा वाद पुन्हा मोठा झाला. त्यानंतर विराट आणि गंभीर पुन्हा एकमेकांवर चिडून मागे आले आणि त्यांच्यात वाद सुरू झाले.

COMMENTS